Additional information
लेखक | रवी कोरडे |
---|---|
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹130.00.₹110.00Current price is: ₹110.00.
साहित्य अकादमी नवी दिल्लीच्या युवा पुरस्काराने सन्मानित कवितासंग्रह.
कृषी जीवनाची झालेली पडझड या केंद्रवर्ती जाणीवेसह वर्तमानकाळातील ग्रामसंस्कृतीचे स्थित्यंतर, कृषक समाजाचा कारुण्याचा स्वर, रूपकाच्या माध्यमातून आलेले गाव, वारकरी असणाऱ्या शेतकरी बापाच्या अंतर्मनात सलणारी बोच, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जीवनाचे संयत दर्शन, कवीचे बालपण, त्याच्या आजूबाजूचा भवताल, भवतालातली माणसं, शेत, शिवार, भूमी या सर्वांना युगानुयुगे लगडलेली माती अशी विविधांगी आशयसूत्रे या संग्रहातून येतात. ‘स्व’शोधनाचा पार ओलांडून ही कविता सामान्य जनांची, समूहाची भाषा अभिव्यक्त करते.
निसर्गाशी सांधा जोडून राहणारी ही कविता निसर्गातील प्रतिक, प्रतिमांतून आपल्याशी संवाद साधते. या कवितेत पाऊस आपलं स्वतंत्र अस्तित्वरूप घेऊन प्रकटतो. या संग्रहातील कविता मातीशी घट्ट नाळ जोडलेली, निसर्गाशी एकरूप झालेली, निसर्गाशी संवाद साधणारी, निसर्ग मैत्रीच्या खाणाखुणांची दर्शन घडवणारी आहे. जागतिकीकरणामुळे जगण्याची बदललेली परिभाषा, गावकुसावर झालेले परिणाम, आधुनिक युगातील प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये झालेले वारेमाप प्रयोग, केवळ नफेखोरीच्या उद्देशामुळे शेती संस्कृतीवर झालेल्या परिणामाबाबत ही कविता चिंता व्यक्त करते. स्वतःच्या आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विस्थापनाचे अनुभव मांडतांना समग्राला वेढून असणाऱ्या गावाचे ‘धूसर होणं ‘ ह्या वैचारिक / सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचे अधोरेखित ही कविता प्रतिपादित करते.
Reviews
There are no reviews yet.