Additional information
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पाने | ७६ |
बांधणी | पेपरबॅक |
₹80.00
धर्म, राष्ट्र आणि समाजवाद या तीन गोष्टींबद्दलचे पुढील विवेचन करताना मी या संज्ञांच्या प्रथम व्याख्या करून मग पुढचे बोलायचे असे केलेले नाही. व्याख्या करताना माणूस आपल्याला सोयीची व्याख्या करून घेतो आणि त्या व्याख्येत न बसणाऱ्या बाबींना वगळू शकतो. ही सोय खरी पण या पद्धतीत दोषही आहे. सामाजिक आणि वैचारिक संदर्भात हा दोष ढोबळपणे घडू शकतो. भूमितीसारख्या गणिती शास्त्रात व्याख्यांपासूनच आरंभ करणे शक्य असते, नव्हे आवश्यकही असते. उलट धर्म, राष्ट्र, समाजवाद या संकल्पनांच्या बाबतीत आपण वेगळी पद्धती स्वीकारणे योग्य ठरते. प्रत्यक्षात धार्मिकता म्हणजे काय? प्रत्यक्ष राष्ट्र कशी उदयास आली व नांदत आहेत? आणि समाजवादाची तत्त्वे आणि व्यवहार प्रत्यक्षात कसा घडत गेला? अशा वास्तव निरीक्षणापासून प्रारंभ करणे आणि शक्य तेवढे समग्र वास्तव विचारात घेणे उपयोगी ठरते.
धर्म, राष्ट्र आणि समाजवाद या तीन गोष्टींचा एकवट, परस्परांशी संबंध आणि साकल्याने विचार आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
– दि. के. बेडेकर
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पाने | ७६ |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.