Additional information
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पाने | १७८ |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
‘धर्म’ म्हणजे निव्वळ नैतिकता नाही. तसे असते तर नव्याण्णव टक्के माणसे धार्मिक असतात व तरी अनीती एवढी पसरलेली आहे, असे झाले नसते. ‘धर्म’ म्हणजे निव्वळ आध्यात्मिक विचार व साधना नाही. तसे असते तर सगळी धार्मिक माणसे आध्यात्मिक झाली असती; तसे दिसत नाही. ‘धर्म’ म्हणजे निव्वळ समाजधारणेचे नियम नाहीत, समाजसेवेची स्फूर्ती व क्रिया नाही. तसे असते तर धार्मिक व्यक्तींनी व माणसांनी गजबजलेले समाज हिंस्र अन्यायांनी, संघर्षांनी व संकटांनी ग्रस्त दिसले नसते.
जेव्हा धर्माच्या ‘दास्या’चा प्रश्न आपण विचारात घेतो तेव्हा धर्माचे नैतिक, आध्यात्मिक व समाजसेवेला प्रवृत्त करणारे गुण आपण विचारात घेतो व त्यांचे वर्तमानातले व इतिहासातले अस्तित्व मान्य करतो, परंतु ते गुणच तेवढे न पाहता, धर्माचे अवगुण किंवा दोषही लक्षात घेतो. या दोषांमुळे धर्म ही भावना आणि प्रत्यक्ष संस्था, माणसांच्या मनाला दास बनवतात, माणसांना आग्रही, अहंकारी व प्रसंगी क्रूर बनवतात. या वास्तवाची आपण दखल घेतो. तशी दखल घेणे जरूरच आहे. ती दखल न घेणे हे भाबडेपणाचे तरी आहे किंवा दांभिकपणाचे आहे. धर्माच्या फक्त गुणांचा गौरव करणे म्हणजे धर्मदास्याचे वास्तव नाकारणे, वर्तमानात व इतिहासात घडलेल्या धर्मप्रेरित क्रूरतेला विसरणे होईल. हा विसर् धर्मगौरवाच्या अभिनिवेशाने किंवा स्वार्थामुळे माणसांना पडतो. म्हणून धर्माच्या दोषांवर, धर्मभावनेचा अफूसारखा परिणाम होतो या धडधडीत सत्यावर भर देणे काही संदर्भात भाग पडते.
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पाने | १७८ |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.