Additional information
संपादक | नीरज हातेकर । राजन पडवळ |
---|---|
पृष्ठसंख्या | 140 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹140.00.₹120.00Current price is: ₹120.00.
हिंदुस्थानांतील दुष्काळ’ (गो. गो. टिपणीस) आणि ‘निरपेक्ष भांडवल’ (गो. अ. भट) हे दोन अर्थशास्त्रीय निबंध सुमारे शंभर वर्षांपूर्वी प्रकाशित झाले. दोन्ही निबंधांतील विचार तत्कालीन भारतीय अर्थविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर वेगळी दिशा दाखवणारे आहेत. भारतातील प्रचलित सांस्कृतिक रचनांचा वापर मोठे भांडवल उभारण्यासाठी कसा करता येईल याची मांडणी गो. अ. भट यांनी केली आहे; तर भारतातील दुष्काळाची अकरा कारणे सांगताना, दुष्काळाचा संबंध बहुजन समाजाच्या दारिद्र्याशी व दारिद्र्याचा संबंध ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या शोषक धोरणांशी कसा आहे हे गो. गो. टिपणीसांनी दाखवून दिले आहे.
अर्थशास्त्राचे अभ्यासक नीरज हातेकर व राजन पडवळ यांनी या दोन्ही निबंधांचे संपादन करताना, तत्कालीन भारतातील महत्त्वाचे अर्थविषयक विचारवंत दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे इत्यादींच्या विचारांचा परामर्श घेत, त्या पार्श्वभूमीवर भट व टिपणीस यांच्या या निबंधांचे वेगळेपण व मौलिकता प्रस्तावनेतून स्पष्ट केली आहे.
संपादक | नीरज हातेकर । राजन पडवळ |
---|---|
पृष्ठसंख्या | 140 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.