Additional information
लेखक | डॉ. सुनीलकुमार लवटे |
---|---|
पृष्ठसंख्या | 126 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹130.00.₹110.00Current price is: ₹110.00.
सुनीलकुमार लवटे यांच्या लेखांतील चित्रणविषयाचा लक्षणीय विशेष म्हणजे; ते ज्या वंचित समूहाचे जग चितारतात ते सर्वस्वी अभावाचे, दुःखाचे अनिश्चिततेचे जग आहे. या माणसांचे जीवनचक्र पराकोटीच्या दुःखचक्राला बांधलेले आहे. दारिद्र्य, अनाथपण, वंचना त्यांच्या वाट्याला आलेली आहे. या माणसांच्या जगण्यातील केवळ दुःखाचे, अन्यायाचे करुणेचे ते केवळ चित्रण करत नाहीत. ही माणसे मोडून पडत नाहीत, सदैव जगण्याला दोन हात करतात. पुन्हा नव्याने आयुष्य उभं करतात. जीवन जगण्याची अदम्य विजीगिषा वृत्ती त्यांच्यात आहे. जीवनावरच्या या आस्थेपोटीच ते अभावाच्या जगाला समांतर पर्याय शोधतात. आणि वाटचाल करतात. नैराश्य, उदासीनता, विमनस्कतेच्या गर्तेतून पुन्हा नव्याने जगण्याला कवटाळतात आणि आनंदाने स्वतःच्या जीवनविषयक दृष्टीने आपले मार्ग शोधतात. म्हणून या लेखनातील नायक-नायिका सतत नवे जग आपलेसे करतात. ती केवळ कुढत बसत नाहीत. अशा माणसांच्या या शौर्यगाथा आहेत.
यातील अनेक माणसे दुःसह अडचणीवर, संकटांवर मात करून यशस्वी होतात. मूकबधीर सचिन आंतरिक उर्जेने अपंगत्वावर मात करून बँकेचा मॅनेजर होतो. बहुविकलांग वल्लरी एम. ए. संस्कृत मध्ये पहिली येते. चेहऱ्यावर व्रण असणारी बेबी शिक्षिका होते. शरीरात भिन्नलिंगी झालेले बदल स्वीकारून वासंती नगरसेविका होते. विपीन शून्यातून करोडपती होतो. अशा निराळ्या जगातील या माणसांच्या यशोगाथा या कहाण्यातून मांडल्या आहेत.
दुःखहरण मधील लेखनाला मोठा वैचारिक / सामाजिक संदेशही आहे. पराकोटीच्या अभावाच्या जगातून ही माणसे यशस्वी होतात. जिद्द, चिवटपणा व अदम्य इच्छेच्या बळावर ते जीवन तारून नेतात. कोशिश करनेवाले की कभी हार नही होती, मैं नही मेरा काम बोलेगा यावर श्रद्धा असणाऱ्या माणसांचे हे जग आहे. शून्याचे शतक होतानाचे विश्व या लेखनात लवटे यांनी उभे केले आहे
लेखक | डॉ. सुनीलकुमार लवटे |
---|---|
पृष्ठसंख्या | 126 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.