Additional information
लेखक | संध्या नरे-पवार |
---|---|
पृष्ठसंख्या | 288 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
आदिवासींच्या जगण्याचा, आदिवासी स्त्रीजीवनाचा विविध अंगांनी वेध घेणारं लेखन आज केलं जात आहे. मात्र त्याच वेळी आदिवासींमध्ये अस्तित्वात असलेल्या, आदिवासी स्त्रीचा बळी घेणाऱ्या डाकीणप्रथेविषयी सर्वाधिक मौन पाळलं जात
आहे. मौनाच्या कडेकोट पहाऱ्यात ही प्रथा बंदिस्त आहे. या पहाऱ्याला छेद देत या प्रथेशी संबंधित विविध घटकांना बोलतं करण्याचं काम या पुस्तकाने केलं आहे. लोकप्रतिनिधींपासून ते पोलीस यंत्रणेपर्यंत आणि शिक्षणव्यवस्थेपासून ते आरोग्यव्यवस्थेपर्यंत विविध घटक या प्रथेचे मूक साक्षीदार आहेत. ही सांगड इथल्या व्यवस्थेच्या फायद्याची आहे.
डाकीण म्हणून स्त्रीला मारणारी ही प्रथा सकृतदर्शनी आदिवासींमधील अंधश्रद्धा म्हणून सामोरी येते. परंतु स्त्रीच्या संदर्भातली कुठलीही प्रथा ही कधीही केवळ अंधश्रद्धा असत नाही. या अंधश्रद्धेच्या पल्याड अनेक सत्तासंघर्ष असतात हे सांगताना खुद्द डाकिणीचा इतिहास शोधण्याचाही प्रयत्न या पुस्तकात केला आहे. केवळ सैद्धान्तिक मांडणीच्या रूढ वाटेने न जाता शोधपत्रकारिता – अभ्यास-संशोधन आणि सिद्धान्तन अशा वाटांनी हा लेखनप्रवास झाला असल्यामुळे तो अत्यंत वाचनीय तर आहेच परंतु अनेकदा इतिहासाच्या संदर्भात वर्तमानाचा अन्वयार्थ लावताना उघड झालेल्या अकल्पित सत्यांनी चिंतनीयही झाला आहे.
लेखक | संध्या नरे-पवार |
---|---|
पृष्ठसंख्या | 288 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.