लोकवाङमय गृह

Shop

टाहोरा । अनिल साबळे

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

अनिल साबळेची कविता अर्तबाह्य पर्यावरणवादी आणि वैचारिक / सामाजिक जाणीवेची असूनही ती आक्रस्ताळी नाही. कमालीची संयत, ती शांतपणे आपल्यासमोर घटनांचे विवरण देत असते. वाचकानेच अंर्तमुख होऊन विचार करावा अशी तिची आच असते. पाब्लो नेरूदा एका ठिकाणी म्हणतात, या आणि पहा रक्त रस्त्यामधले. उफाळून वर येणाऱ्या क्रोधावर मणाचा दगड ठेवून अनिल अत्यंत शांतपणे आदिवासी जगण्याचे केवळ वास्तव मांडत असतो. मात्र त्याचा कवितेमध्ये उपहास कमालीचा कडवा, वाचकाच्या काळजाला घरं पाडणारा असतो. “कासव विकणारी म्हातारी’ नावाची ही कविता, आठवडी बाजारात कासव विकणाऱ्या म्हातारीशी तो नेहमीच बोलत असतो. बोलता बोलता म्हातारी आपल्या मेलेल्या नवऱ्याविषयी सांगते, “”तो खैराचा कात काढतो. लाकडांचा कोळसा पाडत होता. सुट्टी मागितली म्हणून त्यांनी त्याला जीवंत जाळलं. इतकं सोपं त्याच्या मरणाच कारण होतं.” आधुनिकतेच्या नावाखाली जंगल जमीनदोस्त होतील, वनौषधींची झुडपं आणि कंदमुळं, वेली र्निवंश होतील डांबर ओतलेल्या जमीनीसारखी. अरण्यातील श्वापदं, पाण्याचे प्राचीन झरे आटले जातील. इथली माणसं पोटासाठी विस्थापित होतील, मेलेल्या जनावरासाठी फिरणाऱ्या गिधाडांसारखी ही विमान… या सर्व गोष्टीतून कधी काळी समृध्द शांत सद्भावना जोपासत जगलेली मानवी संपन्न विरासतच नष्ट होईल. असले प्रगाढ दु:ख उरात घेवून आपल्या कुवतीत आणि शब्द कृतीतून आदिवासी नवजातांची अनिल काळजी वाहतोय. लोकवाङ्मय प्रकाशनाने प्रसिध्द केलेल्या “टाहोरा’ या संग्रहातील अनिल साबळेची कविता एका दीर्घ दु:खात कादंबरीतील कथानकाचा ऐवज असल्यासारखीच आहे. ज्यातून भविष्यात आदिवासी समाजात महाकादंबरी निर्माण होण्याची शक्यता आहेत. “जय’नावाच्या इतिहास सारखेच “टाहोरा’ हे संकल्पित महाकाव्याचे एक पर्व आहे.

Additional information

लेखक

अनिल साबळे

पृष्ठसंख्या

84

बांधणी

पेपरबॅक

आवृत्ती

पहिली आवृत्ती – एप्रिल २०१९
दुसरी आवृत्ती – मार्च २०२५

ISBN

978-93-82906-49-0

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “टाहोरा । अनिल साबळे”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us