Additional information
संपादक | किशोर बेडकिहाळ |
---|---|
पृष्ठसंख्या | 298 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹350.00.₹300.00Current price is: ₹300.00.
वसंत पळशीकरांची या संग्रहातून व्यक्त झालेली हिंदू- मुस्लीम जातीयवादाची चिकित्सा तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. कोणाच्याही बाजूने पक्षपात न करणारी, हिंदू- मुसलमानांच्या (व इतरही समाजगटांच्या) एकत्रित राहण्याच्या अपरिहार्यतेची गरज अधोरेखित करणारी, संयम-विवेकाला दुबळेपणा न मानता त्याची कास धरणारी, आपापली वैशिष्ट्ये जपत असतानाच मूलभूत एकात्मतेचा आग्रह धरणारी, पारंपरिक राष्ट्रवादापासून फारकत घेऊन भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादाची कास धरणारी, सर्वच समाजघटकांचा समावेश असलेली बहुसांस्कृतिकता स्वीकारणारी, आपल्या इतिहासाचा व संस्कृतीचा वारसा विवेकाने पुढे चालवण्याचा आग्रह धरणारी, सुसंस्कृत व माणुसकीचे पोषण होईल अशा राजकीय-वैचारिक / सामाजिक प्रक्रियांचा व रचनांचा आग्रह धरणारी, इतिहासातले ग्रह-पूर्वग्रह न बाळगणारी पण सत्याचा अपलाप न करणारी, द्वेषात्मक प्रचारापासून अलिप्त राहणारी, संताप, अवमान, उपेक्षेच्या भाषिक दुर्गुणांपासून मुक्त असणारी व आपल्या स्वतःच्या श्रेयस्कर जीवनमूल्यांशी सुसंगत राहणारी अशी ही चिकित्सा आहे.
मुस्लीम प्रश्नांच्या मराठी चर्चाविश्वातील हमीद दलवाई – अ. भि. शहा – नरहर कुरूंदकर यांच्या मुख्य धारणेपेक्षा वेगळी चिकित्सा करून वसंत पळशीकरांनी मराठी विचारविश्वात अमूल्य योगदान केले आहे.
– किशोर बेडकिहाळ, प्रस्तावनेतून
संपादक | किशोर बेडकिहाळ |
---|---|
पृष्ठसंख्या | 298 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.