Additional information
लेखक | चंद्रकांत केळकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 180 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹180.00.₹160.00Current price is: ₹160.00.
गेल्या ५० वर्षांत जागतिक भांडवलशाहीचे तांडवनृत्य कसे चालू आहे. हे जर कोणत्याही मराठी वाचकाला समजावून घ्यायचे असेल तर त्याकरता सगळ्यात सोपा व शास्त्रीय मार्ग म्हणजे प्राचार्य चंद्रकांत केळकरांचा प्रस्तुत लेखसंग्रह वाचणे, हा होय.
२०१३ सालच्या जागतिक संपत्ती अहवालानुसार जगातील प्रौढ लोकसंख्येपैकी निम्म्या लोकसंख्येजवळ जागतिक संपत्तीपैकी फारतर १ टक्का संपत्ती आहे. वरच्या १० टक्के लोकांकडे ८६ टक्के संपत्ती आहे आणि सर्वात वरच्या १ टक्के लोकांजवळ एकूणपैकी ४६ टक्के संपत्ती आहे. जागतिक संपत्ती २०१३मध्ये ४.९ टक्क्यांनी वाढून २४१ ट्रिलिअन अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी शिखराला पोचली आहे. इतक्या संपत्तीवाढीत सामान्यांच्या वाटेला अनिश्चितता आणि विषमता का? ह्याचे उत्तम विश्लेषण वाचकाला प्रस्तुत संकलनात सापडेल.
जागतिकीकरणात श्रम ह्या मानवी स्वरूपात वावरणाऱ्या उत्पादन घटकाची झालेली फरपट आपण पाहत आहोत. मग ती फरपट म्हणजेच बहुसंख्यांचा विकास आहे, की बहुसंख्य असलेल्या श्रमिकांकरता म्हणजेच समाजाकरता, विकासाची वेगळी पद्धती व उद्दिष्टे असू शकतात का, या दृष्टिकोनातून गेली ४०-४५ वर्षे प्राचार्य केळकरांनी चिंतन व लेखन केल्याचे दिसून येईल. त्याचेच दृश्य फळ म्हणजे हा संकलित लेखसंग्रह होय.
– श्रीनिवास खांदेवाले, प्रस्तावनेतून
लेखक | चंद्रकांत केळकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 180 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.