Additional information
संपादक | पुष्पा भावे |
---|---|
पृष्ठसंख्या | 204 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
मराठी साहित्याच्या वर्तुळात पत्रकार- साहित्यिक ही काही नवलाची गोष्ट नाही. प्रतिमा जोशी याही आपल्याला पत्रकार म्हणून परिचित आहेत. विशेषतः त्यांच्या वार्तापत्रांत असलेला परिघावर जगणाऱ्या माणसाविषयीचा आपुलकीचा स्वर आपल्याला ओळखीचा आहे. पण हा आपुलकीचा स्वर भावविवश होत नाही, कारण प्रतिमा जोशी यांना व्यवस्था आणि व्यवस्थाबदलाची कणखर वास्तवता परिचित आहे.
प्रतिमा जोशींच्या कथेकडे पाहताना जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातल्या निवेदकाचा ननैतिक दृष्टिकोन! त्यांच्या कथेतील निवेदक समाजमान्य नैतिकतेचे मापदंड मानीत नाही पण त्याहीपलीकडची माणसामाणसातील गाभ्याची नैतिकता त्यांच्या निवेदनातून व्यक्त होते. एखाद्या वादाची छत्री मिरवत माणसाच्या वागणुकीचा योग्य-अयोग्य न्याय करण्याची भूमिका या कथांत नाही. तरीही माणूस माणसाला किती विविध तन्हांनी छोटा करतो याविषयीची जाणीव या कथांतून व्यक्त होते. या सर्वच कथांत लेखिकेने वातावरण, पात्रधर्म यांच्याशी भाषेचे रूप मिळतेजुळते राखले आहे. स्त्री कथाकारांच्या आत्ममग्न विमनस्कतेपेक्षा या कथांचे रूप वेगळे आहे.
– पुष्पा भावे ( प्रस्तावनेतून )
संपादक | पुष्पा भावे |
---|---|
पृष्ठसंख्या | 204 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.