लोकवाङमय गृह

Shop

चोखोबांचा परिवार : एक शोध । माधव पुटवाड

Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम अशी तेरावे ते सतरावे शतक सलग चारशे वर्षे आपल्या भाषेत श्रेष्ठ दर्जाची कविता लिहिली गेली. तिच्यातून जो वारकरी धर्म उभा राहिला, तोच आपला महाराष्ट्र धर्म. यातूनच या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा अपवादात्मक महापुरुष उदयाला आला. माणुसकी आणि समानता ही या धर्माची मूळ तत्त्वे आणि अंतिम उद्दिष्टे होती. नामदेवाने या भूमीचा पाया घातला. त्याच्या अठरापगड जातींतील सहकवींपैकी एक चोखोबा. आज हे सगळे कवी आपण आपल्या जातीत वाटून घेऊन टिकवले आहेत.
शक्य तिथे त्यांच्या नावे पोटजाती निर्माण केल्या आहेत. जसे की नामदेव शिंपी (!). चोखोबाला तर असा जातीचा आधारही उरलेला नाही. फक्त आपल्या कवितेच्या बळावर आजही हा कवी टिकून राहिलेला आहे. त्याच्या कवित्वाचा आणि जीवनाचा सांगोपांग तपास / अभ्यास करण्याचा अव्वल प्रयत्न माधव पुटवाड यांनी या ग्रंथात अपरिमित आस्थेने केला आहे.
चोखोबा, त्याची पत्नी सोयरा, त्याची बहीण निर्मळा, मेव्हणा बंका आणि मुलगा कर्ममेळा अशा एकाच कुटुंबातल्या सगळ्यांनी कवी असणे आणि उरणे हे केवळ अपवादात्मक आणि दुर्लभ असे वास्तव आहे. त्याचा अत्यंत उचित असा वेध माधव पुटवाड यांनी या ग्रंथात घेतलेला आहे.
चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास मनाला नक्कीच नवी उभारी देणारे आहेत. त्यासाठी मी श्री. माधव पुटवाड यांचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो.
– रंगनाथ पठारे

Additional information

लेखक

माधव पुटवाड

पाने

२६०

बांधणी

पेपरबॅक

ISBN

978-93-93134-68-4

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चोखोबांचा परिवार : एक शोध । माधव पुटवाड”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us