लोकवाङमय गृह

Shop

गावो खुशी के गीत । डॉ. याकूब सईद

Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

 

भारतात १९२० पासून मूक चित्रपटाची सुरुवात झाली. १९३१ मध्ये चित्रपट भारतात बोलू लागला. १९३१ ते आजपर्यंत किमान दहा हजारहून अधिक चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. आणि ही क्रिया आता थांबणार नाही. रोज त्यात भर पडत राहणार. अलीकडेच भारतीय सिनेमाला शंभर वर्ष पूर्ण झाली. बी लेटेड हॅप्पी बर्थ डे इंडियन फिल्म इंडस्ट्री.देवाची कृपा तुझ्या विकासावर होवो ही माझी देवाजवळ प्रार्थना. तुझ्यामुळे हजारोच काय लाखो कलाकार, लेखक, कवी, दिग्दर्शक, संगीतकार, चित्रपटात काम करणार्‍यांचा दुवा तुला आहे. जय हिंद जय भारत’. आजहीr मी खूप आनंदी आहे. १९४२ साली (८ किंवा ९) वर्षांचा असेन. सिनेमा हॉल बाहेर दरवाजाजवळ उभं राहून एक आना आह एक आना, बरसात, एक आना, बरसातगाण्याची पुस्तक विकत असे. आज दूरदर्शनच्या वातानुकूलीन खोलीत डायरेक्टरच्या खुर्चीवर बसून तेच काम दूरदर्शनद्वारे करत आहे. माझ्या मते दूरदर्शन हे घरातले थिएटर. तिथे तुम्ही टिकीट न काढता, खुर्चीवर बसून आई-वडील, बायको, मुलांबरोबर चला पोहे खात खात चित्रपट पाहताना हसता, रडता, ओरडता करू शकता.

सुरुवातीला भारतीय चित्रपट करणार्‍यांना एक भाषा पाहिजे होती. सिनेमाकरिता त्यांनी उर्दू भाषा निवडली. उर्दू भाषेचा विकास चित्रपटाद्वारे- काश्मीर ते कन्याकुमारी व बंगाल ते गुजरातपर्यंत झाला. उर्दूबरोबर भारतीय अन्य भाषांचाही विकास झाला.

चित्रपटाची निर्मिती पुढे हजारो वर्षे अशीच राहणार. भारतीय चित्रपट भारतीयांनाच नव्हे, तर जगाच्या पाठीवर प्रत्येक व्यक्तीला आनंदीत करणार आहे.

फिलीम, शीनेमा, पिकचर, खेळ, शो, छबी, कुठंही नाव घ्यासर्वांची शंभर वर्ष पूर्ण झालीत. या आनंद सोहळ्यात आपण सामील होऊ या आणि म्हणू या… गावो खुशी के गीत.

 

डॉ. याकूब सईद

Additional information

लेखक

डॉ. याकूब सईद

मुखपृष्ठ

मिलिंद कडणे

पृष्ठे

155

बांधणी

Paperback

ISBN

978-81-989061-9-9

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गावो खुशी के गीत । डॉ. याकूब सईद”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com