Additional information
| Weight | .140 kg |
|---|---|
| लेखक | देवीदास सौदागर |
| मुखपृष्ठ | मिलिंद कडणे |
| बांधणी | Paperback |
| पृष्ठसंख्या | 92 |
| ISBN | 978-81-989061-0-6 |
Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
‘पायपीट’ आणि ‘पोटमारा’ या दोन गोष्टींचा पाठलाग हे देवीदास सौदागर यांच्या या संग्रहातल्या कवितांचे सूत्र आहे. कष्टणाऱ्या जीवांच्या आयुष्यात भाकरी दुर्मीळ करणारा हा काळ असल्याची प्रचिती कवीला येते, त्यानंतर ‘बहर जाळला कुणी ?’ असा त्याचा सवाल आहे. धागे जोडणाराच्या वाट्यालाही लक्तरांचे दिवस यावेत हे कोरड्या कफल्लक प्रहराचेच लक्षण… तरीही कवी काळ जोडण्यासाठी अखंड टाके घालत राहतो हा या कवितेचा चिवट असा धागा होय.
राबणाऱ्यांचा पिढ्यान पिढ्यांचा वारसा सांगताना ही कविता लोकरहाटीतले घामाचे अनेक संदर्भ उजळ करत जाते, श्रमाच्या शोषणाला उजागर करते. ही कविता पिचलेल्या अनुभवांची असली तरीही अनवट प्रतिमा – प्रतीकांच्या आधारे ती पिचलेपणावर पाय रोवून नव्या वळणावर एखाद्या सुळक्यासारखी येऊन उभी राहते. इथल्या अभावांना सखीच्या प्रेमळ स्पर्शाची पालवी असल्याने दुःखाचे हे प्रहर सुसह्य होतात. वेदनेच्या भुयारातही एखादा उजेडाचा कवडसा यावा आणि त्याने अंधाराच्या कोठडीला उजळून टाकावे अशा अनेक प्रकाशमान जागा या कवितेत आहेत. कवी म्हणून देवीदास सौदागर यांची ओळख या संग्रहाच्या निमित्ताने आणखी दृढ होईल हे नक्की !
– आसाराम लोमटे
| Weight | .140 kg |
|---|---|
| लेखक | देवीदास सौदागर |
| मुखपृष्ठ | मिलिंद कडणे |
| बांधणी | Paperback |
| पृष्ठसंख्या | 92 |
| ISBN | 978-81-989061-0-6 |
Reviews
There are no reviews yet.