लोकवाङमय गृह

Total:
3,445.00

Shop

गल्ली बदललेला मोर्चा । राम दोतोंडे

Original price was: ₹135.00.Current price is: ₹110.00.

भूतकाळाचे पछाडलेपण टाळून वर्तमानाचे वस्तुनिष्ठ आकलन आणि भवितव्याची स्पष्ट रूपरेषा मांडणारी ‘गल्ली बदललेला मोर्चा’मधील कविता आत्मचरित्राऐवजी आत्मशोध अभिव्यक्त करते हे या कवितेचे सर्वात लोभस वैशिष्ट्य आहे. आत्मघातक विघटन आणि मध्यमवर्गीय आत्मतुष्टता यांच्या बाधेमुळे कालौघात गल्ली बदलून दिशाहीन झालेल्या मोर्चाच्या पडझडीचं परखड आत्मपरीक्षण राम दोतोंडे या कवितेत करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही केवळ विशिष्ट जातीची चळवळ नव्हती तर ती मानवजातीच्या मुक्तीची चळवळ होती याचं सजग भान असल्यामुळे पूर्वाश्रमीचे महार, चांभार, मांग, वैदू, भिल्ल, कोळी इत्यादी शोषित जनसमुदायांसोबतच कष्टकरी, स्त्रिया व बालक या सर्वच वंचितांच्या वेदनेला व्यापकतेने ही कविता आपल्या आकाशाच्या सर्वसमावेशक निळाईत सहजतेने सामावून घेते. याही पुढे जाऊन ज्या गावाने ‘परसात वाढवले त्याने ठेवून जरी मनी जात’ त्या गावाबद्दलही ‘तीळ तीळ तुटतो जीव ऐकून दशा गावाची’ असा या सर्वसमावेशकतेचा विस्तृत आविष्कार या कवितेत वाचायला मिळतो. व्यापक जीवनदृष्टी, वैचारिक / सामाजिक परिपक्वता व समग्रता यामुळे दलित कवितेला एका वेगळ्या उंचीवर नेणारी ‘गल्ली बदललेला मोर्चा’मधील कविता ही दलित कवितेचे नवे, विस्तृत व आश्वासक वळण आहे.
– सुहास जेवळीकर

Additional information

लेखक

राम दोतोंडे

पृष्ठसंख्या

104

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गल्ली बदललेला मोर्चा । राम दोतोंडे”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us