Additional information
लेखक | रामचंद्र नलावडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 260 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
भ्रष्टाचार हा एकूणच भारतीय वैचारिक / सामाजिक/ आर्थिक व्यवहाराचा एक भागच झाला आहे. जगात भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताचा खूपच वरचा क्रमांक लागतो. मुक्त व मोकाट अर्थव्यवस्थेमुळे कॉर्पोरेट व उच्च राजकीय पातळीवरील लाखो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या रोज नव्या नव्या कथा पुढे येत आहेत आणि या व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे.
पण अगदी निम्न पातळीवर सर्वसामान्य माणसांना नाडणारा भ्रष्टाचार म्हणजे जनतेच्या दैनंदिन व्यवहाराशी जोडलेला शासकीय व निमशासकीय यंत्रणेमधील भ्रष्टाचार. यात अगदी खेड्यापाड्यांतील आणि शहरातील गरीब जनताही भरडली जाते आणि हताश होते. या यंत्रणांमधून काम करणारे कनिष्ठ व मध्यमवर्गीय कर्मचारीही भ्रष्टाचारात बरबटून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या -हासाबरोबरच वैयक्तिक जीवनातील शोकांतिकेला बळी पडतात. ही कादंबरी दैनंदिन लोकव्यवहाराशी संबंधित शासकीय यंत्रणेतील या भ्रष्टाचाराचा अगदी आतून वेध घेते आणि भ्रष्टाचारामागील सूक्ष्म पदर प्रत्ययकारीपणे उलगडत जाते.
– अविनाश कदम
लेखक | रामचंद्र नलावडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 260 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.