Additional information
संपादक | संजय आर्वीकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 206 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
कमल देसाई यांची जीवनदृष्टी समग्रतेचा ध्यास असणारी आणि मानवी अस्तित्वासह साऱ्या सृष्टीला गवसणी घालणारी आहे. सृष्टी आणि आधुनिक माणूस यांच्यातील द्वंद्वाचा वेधही त्यांची प्रतिभा घेते. अस्तित्ववादी विचारसरणी, बौद्ध तत्त्वज्ञान आणि लोकायताची सूत्रे यांच्या संश्लेषणातून त्यांची जीवनदृष्टी उमललेली आहे.
निर्मिती, शोध आणि खेळ या तीनही प्रेरणा त्यांच्या लेखनात एकवटल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही निर्माता, लहान मूल आणि तत्त्वज्ञ हे पैलू एकत्रित आले आहेत. साध्या लौकिक गोष्टींबद्दल बोलता बोलता एकदम तत्त्वज्ञानाकडे झेपावत साध्या खेळाचे वैश्विक खेळात रूपांतर करणे, याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात अनेकदा येतो. त्यांची प्रतिभा काळाचे ‘अगदी सहजपणे खेळणे’ करते.
नैतिकता आणि मानवी मूल्य याबाबत त्यांची भूमिका ठाम आणि प्रखर आहे. प्रस्थापित मूल्यव्यवस्थेची चौकट खिळखिळी होईल इतके मूलगामी प्रश्न त्या उपस्थित करतात. स्खलनशील माणसाला असणारं पापाचं आकर्षण हे सूत्र त्या परतत्त्वात्मक बंडखोरीपर्यंत नेऊन भिडवतात.
स्त्रीवादी प्रेरणा, स्वातंत्र्य, बंडखोरी, आधुनिकता, प्रयोगशीलता आणि चिंतनशीलता या सर्वच अंगांनी मराठी लेखिकांच्या कथात्म साहित्याच्या शिखरस्थानी अजूनही कमल देसाईच आहेत.
– संजय आर्वीकर
संपादक | संजय आर्वीकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 206 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.