लोकवाङमय गृह

Shop

काळाराम मंदिर सत्याग्रह : विद्रोहाकडून क्रांतीकडे । उत्तम कांबळे

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

नाशिकचा काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह म्हणजे दीर्घकाळ टिकून राहिलेली आणि सामाजिक इतिहासात ठळकपणे नोंदवलेली गेलेली केवळ एक घटना नव्हे. तशी तर ती आहेच; पण त्याशिवाय सत्याग्रहपूर्व घडलेल्या अशाच प्रकारच्या अनेक घटनांची त्यावर गडद छाया आहे. तीव्र होत गेलेला संघर्ष आहे. या घटनेला समांतर आणि नंतर घडलेल्या अनेक घटनांच्या प्रेरणाही सत्याग्रहातून तयार झाल्या. सत्याग्रहाच्या निमित्ताने अस्पृश्यांनी छळवादी धर्म, देव आणि मंदिर संस्थांशी असलेले नातेच तोडून टाकले. सत्याग्रह काळातच येवल्यातील परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैश्विक धक्का देणारी घोषणा केली आणि धर्मांतराच्या दिशेने पाऊल टाकले. ‘हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ या त्यांच्या घोषणेने चित्रच बदलून टाकले. सत्याग्रह म्हणजे असे एक ऊर्जाकेंद्र बनले, ज्याने भावी लढायांना प्रेरणा दिल्या किंवा लढायांचे स्वरूप बदलले. सत्याग्रह सोडून सत्ता आणि शिक्षण संपादनाची एक मोठी लढाई सुरू झाली. जिच्यातून उद्याचा समाज बदलणार होता. सत्याग्रहातील जय-पराजय मोजण्याचे हेच एक साधन आहे. २०३० ला या सत्याग्रहाची शताब्दी सुरू होत आहे. यानिमित्ताने ही सारी सामाजिक स्पंदने समजून घ्यायला या ग्रंथामुळे मदत होणार आहे.

Additional information

मुखपृष्ठ

धनंजय गोवर्धने

बांधणी

paperback

ISBN

978-81-998771-0-8

पृष्ठसंख्या

192

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काळाराम मंदिर सत्याग्रह : विद्रोहाकडून क्रांतीकडे । उत्तम कांबळे”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com