Additional information
लेखक | संकलन, संपादन : सुहास एकसंबेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 172 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
कोल्हापूरच्या कवितेला जवळपास तीनशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे. ती खंडित असली तरी आपल्याला अभिमान वाटावा इतकी ती संपन्न आहे. बहिणाबाई या सतराव्या शतकातल्या संत कवयित्रीने या परंपरेचा पाया घातला. त्यांची कविता ही कर्मकांडाचा निषेध करणारी, धार्मिक आणि वैचारिक / सामाजिक अनाचाराचा उपरोध करणारी, धर्मभेद-जातिभेद – लिंगभेद न मानणारी आणि प्राचीन भारतीय तत्त्वकवितेचा उदारमतवादी आणि उदात्त वारसा जपणारी कविता आहे. दोन शतकांच्या खंडानंतर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात फारशी कवितेचा प्रवाह मराठी कवितेत आणून सोडणाऱ्या माधव जूलियन यांची कोल्हापूर ही काही काळ कर्मभूमी होती. त्यांच्यामुळे कोल्हापूरच्या द्वैभाषिक कवितेची परंपरा अजून समृद्ध झाली. या फारशी कवितेतून सुफी कवितेचा प्रवाह उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात आला तसा कोल्हापुरात आला. माधव जूलियन जसे त्या काळी प्रभावी असलेल्या रोमँटिक भावकवितेच्या परंपरेचे पाईक होते तसे रेंदाळकरही होते. रेंदाळकरांच्या या संग्रहातील कवितांमध्ये येणारे थडगे, दिवाणा, मुशाफरी हे शब्द आणि कल्पना फारशी कवितेचे आणि सुफी कवितेचे अवशेष आहेत. कोल्हापूर ही लोककवी मनमोहन यांचीही कर्मभूमी आहे. राजकवींना ‘थोबाडाया’ निघालेला हा लोककवी कोल्हापूरची कविता ही लोककविता आहे हेच सूचित करतो. ‘सत्त्वाचा ध्वज’ घेऊन निघालेला हा ‘विषांचा वारकरी’ इथल्या उदारमतवादी परंपरेचा वारसा पुरेपूर चालविणारा आहे. आधुनिक मराठी कवितेला ज्यांनी खऱ्या अर्थाचे आधुनिक रूप दिले त्यात अरुण कोलटकर अग्रेसर आहेत आणि ते कोल्हापूरचे आहेत हीही ऐतिहासिक दृष्ट्या तेवढीच महत्त्वाची घटना आहे.
कोल्हापुरी कवितेचा हा समृद्ध वारसा जपणाऱ्या आजच्या तेवीस कवींच्या कवितांचा हा प्रातिनिधिक संग्रह आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांत लिहिल्या गेलेल्या कवितेचा विस्तृत पट या संग्रहात दिसतो. आणि त्यात कोल्हापुरी कवींच्या जवळजवळ तीन पिढ्यांचे कर्तृत्व सामावलेले आहे.
– प्रकाश देशपांडे- केजकर ( प्रस्तावनेतून )
लेखक | संकलन, संपादन : सुहास एकसंबेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 172 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.