Additional information
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
लघुकथा लिहिण्याचे ओ-हेन्रीएटिक धक्कातंत्र किंवा मराठी लेखकांना प्रिय असा आरंभ-शेवटाचा चमत्कृतिपूर्ण प्रयोग करण्याचा या कथांना सोस नाही. अत्तरवाल्याच्या फॅण्टसीपूर्ण गोष्टीत नायिका गटविण्याची तोशीश न करता कपडे विकणारा वरचढ ठरतो आणि एखादा ॲनिमेशनपट पाहिल्यासारखे आपण त्यातील गमतीदार गोष्टीचे साक्षीदार होतो. तरीही या अद्भुतिका नाहीत; प्रेमकथा किंवा प्रेमविरोधी कथाही नाहीत, तर पाटकरांना वेळोवेळी सुचलेल्या दृश्यगोष्टी आहेत. पाटकरांच्या कथालेखनाचा दुसरा टप्पा दोन हजारोत्तरी वर्षांतला. पण तरी या काळातील वेगवान बनलेल्या जगण्याच्या घटकांना फटकावून भलतीच वाट शोधणारा. करोनाकाळात मधेच कधीतरी कथा सुचण्याच्या काळात त्यांचा फोन येई आणि ‘माझ्या डोक्यात एकाच वेळी तीन-चार कथा सुरू आहेत. त्यातली एक या आठवड्यात पूर्ण होईलच,’ या ऐंशीउत्तर वयातील त्यांचा दांडगा उत्साह मला हेवा करण्याजोगा वाटतो. यातली एक कथा ‘सुपर ॲब्स्ट्रॅक’ आहे. आरंभापासून शेवटापर्यंत; पण त्यातली दृश्यशक्ती जबरदस्त आहे. शहरातील मर्यादित निसर्गश्रवण करणाऱ्या मुलाची गावात स्थलांतर झाल्यानंतर ऐकू येणाऱ्या घटकांवर बेतलेली एक कथा आहे, तर दुसऱ्या कथेत गावातून स्थलांतरित होऊन अफरातफर होत असलेल्या बँकेत नुकत्याच लागलेल्या बँक कर्मचाऱ्याची राजकीय पक्षांवर चालणारी चिंतनचर्चा आहे. आरंभबिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत नेणाऱ्या पारंपरिक कथा पाटकरांनी लिहिलेल्या नाहीत. पाटकरी ढंगांनी आणि कल्पना-भराऱ्यांनी त्या सजल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विशिष्ट नजरेतून पाहणेच इष्ट. पाटकरांचा कलाविषयक अभ्यास आणि त्या जाणकारीतून तयार झालेली कथादृष्टी हा या कथांचा विशेष आहे.
– पंकज भोसले
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.