Additional information
लेखक | संजीव खांडेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 172 |
बांधणी | हार्डकव्हर |
आवृत्ती | तिसरी आवृत्ती- फेब्रुवारी २०२५ |
ISBN | 978-93-82906-54-4 |
Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
“संजीव खांडेकरांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येक घटनेकडे वा तिच्या परिणामांकडे ते तात्त्विक (फिलॉसॉफिकल) दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी फ्रॉईड, मार्क्स व डार्विन असे त्रिमितीचे भिंग वापरणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. फ्रॉईडसाठी मानवी इच्छा किंवा लालसा ही अथांग आहे. या लालसेची पूर्ती करण्याचे साधन वा क्षमता माणसामध्ये नसते व म्हणूनच सतत एका गर्क असमाधानात किंवा दुःखात माणसाच्या मनाचा एक मोठा भाग बुडून गेलेला असतो. खांडेकर याच सिद्धांताचा वापर पायाभूत मांडणी करण्यासाठी व पाठोपाठ मार्क्सवादी विचारातून निर्माण झालेल्या ‘परात्मभावा’च्या संकल्पनेचा आधार घेऊन पुढे स्वतःचे चिंतन वाचकांसमोर ठेवतात. या चिंतनात अक्षरशः असंख्य संदर्भाचा उल्लेख असतो. हे संदर्भ जसे समकालीन साहित्य, कविता वा वैचारिक व तात्त्विक लेखक विचारवंतांचे असतात, तसेच समकालीन दृश्यकला, नाट्य व सिनेमा अशा मराठीत क्वचित आढळणाऱ्या क्षेत्रांचेही असतात.
स्वतः दृश्यकलावंत व कवी असल्यामुळे खांडेकरांची भाषा मराठीसाठी नव्या क्षितिजांना स्पर्श करते. भाषेचा डौलदार वापर व भाषेचे चित्रात किंवा दृश्यकलेच्या अवकाशाचे भान असलेल्या भवतालात रूपांतर करण्याचे कसब त्यांचे लेखन वाचताना अनेकदा जाणवते.
शरचंद्र मुक्तिबोध असोत वा कॉ. श्रीपाद अमृत डांगे, इतिहासाचार्य राजवाडे असोत वा र.धों. कर्वे, अशा अनेक मराठी विश्वाला परिचित असलेल्या नामवंतांचे विचार व लेखन खांडेकर पूर्णपणे नव्या स्वरूपात व नव्या संदर्भासह आपल्यासमोर ठेवतात व ही या पुस्तकाची एक अत्यंत जमेची बाजू आहे.”
– अविनाश सप्रे
लेखक | संजीव खांडेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 172 |
बांधणी | हार्डकव्हर |
आवृत्ती | तिसरी आवृत्ती- फेब्रुवारी २०२५ |
ISBN | 978-93-82906-54-4 |
Reviews
There are no reviews yet.