Additional information
लेखक | अनुजा जोशी |
---|---|
पृष्ठसंख्या | 104 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00.
नवतेची आस बाळगणारी अनुजा जोशी यांची कविता एकीकडे बाईचं अस्तित्वच संपून जाण्याची भीती बाळगते, तर दुसरीकडे पुरुषीपणाच्या मुजोरी-पाषाणवृत्तीवर प्रहार करीत मोठ्या हिमतीने उभी राहते. उद्याच्या स्वप्नांची मनाशी खूणगाठ बांधत स्वतःलाच जगण्याचं बळ देते, स्त्रीच्या जगण्यावर लादली गेलेली ‘सनातन’ मर्यादा ओलांडत तिच्या सृजनात्मक सोहळ्याचं स्वप्न बघणं हा तिचा स्थायी स्वभाव आहे. त्यातूनच स्त्रीच्या एकरेषीय आणि रंगीबेरंगी आयुष्याला नाकारत तिचा विचारशील रंग अधिकाधिक गडद करण्याची वाट, ठायी-ठायी शोधत राहते. ‘दुखणाऱ्या कंबरांच्या पोकळीत एकेक गर्भाशय आहे आणि ‘दुख’ तिथेच आहे!’ म्हणत समग्र स्त्रीत्वाचीच जाणीव करून देतानाच बाईच्या पुरुषसत्ताक वेदनेवरच अचूकपणे बोट ठेवते व बाईची सोशिकता, तिचा दाह याचा पुनरुच्चार करताना बाईच्या नैसर्गिक संवेदनशीलतेचं हिरवेपण कसोशीने जपते. आधुनिक जग आणि त्याचे ताणेबाणे, त्यातून निर्माण होणारे नवे प्रश्न, त्यातून शोधावे लागणारे नवनवे संदर्भ हाही जोशी यांच्या कवितेचा एक स्त्रोत आहे. शब्दाच्या अर्थवाही आणि भाववाहीपणाशी एकरूप होत आजच्या कवितेच्या खळखळाटात जोशी यांची कविता आपल्यातलं ‘कवितापण’ टिकवून ठेवण्याचं प्रत्यंतर देते. त्यामुळेच गोयच्या कोकणी भाषेचा गंध चपखलपणे मिसळून सौंदर्यदृष्टीने खुलत गेलेली जोशी यांची कविता आज लिहिल्या जाणाऱ्या विपुल मराठी कवितेत स्वतःची अशी वाट निर्माण करीत असल्याचा विश्वास देत आहे.
– राजन गवस
लेखक | अनुजा जोशी |
---|---|
पृष्ठसंख्या | 104 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.