Additional information
लेखक | जयदेव डोळे |
---|---|
पाने | २२० |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
दुटप्पी, दुहेरी वागण्याची सोय संघाच्या रचनेत आहे. स्वातंत्र्य, प्रजासत्ताक, लोकशाही, राज्यघटना, कायदे असे जे जे प्रचलित आहे ते ते तिरस्करणीय मानत; मात्र ही चीड खोल मनात दडवत सारे स्वीकारल्यासारखे दाखवत चातुर्वर्ण्याच्या पुनरुज्जीवनासाठी शाखा वगैरे व्यवस्था चालवत ठेवण्याला केवढा धीर लागत असेल यांना. वरवर सात्त्विक, सोज्ज्वळ अन् साधुवृत्ती दाखवत राहून मुसलमान, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समता इत्यादी धुडकावून राहायचे म्हणजे केवढे मोठे अभिनेते असतील हे लोक ! शुश्रूषा, सेवा करता यावी यासाठी आजार, रोगराई यांची आराधना करण्यासारखे झाले हे! उभारायचे हिंदू राष्ट्र परंतु त्यासाठी आजची अवघी लोकशाही रचना नष्ट करण्याचा दुष्ट मनोदय सतत बाळगायचा; सोपे नाही असे दुविधेत जगत राहणे! त्यासाठी शरम, नीती, संयम, सहिष्णुता यांची सारी बंधने तोडणे यांनाच जमते ! सत्याची चाड नाही की मानवतेची ओढ. वयाची जाणीव नाही की मनाची भीड. त्या कन्हैया कुमारला चिरडता चिरडता राहिले हे. राष्ट्रद्रोह, दुश्मनांशी फितुरी असे भयंकर संतापजनक खोटारडे आरोप जे करू शकतात ते नाझीझम, फॅसिझम कोळून प्यायल्याचेच लक्षण. सज्जन म्हणवून घेणारे एवढे राक्षसी कसे होऊ शकले?
– जयदेव डोळे
Reviews
There are no reviews yet.