लोकवाङमय गृह

Shop

आपण नागरिक, आपले कायदे | सुनील दिघे |

Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.

Description

जबाबदार नागरिक होण्यासाठी भारतीय राज्यघटनेनं दिलेले हक्क, अधिकार आणि मूल्यांचं यथायोग्य भान असणं अतिशय आवश्यक आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना समतेच्या पातळीवर आणण्यात वंचित, निरपराध नागरिकांना संरक्षण पुरवण्यात कायदे फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, पण त्याची माहिती प्रत्येकालाच असते असं नाही.

सुनील दिघे हे दीर्घकाळ पेशा निभावलेले एक निष्णात वकील. त्यांनी अतिशय सुलभ, सोप्या शब्दांत महत्त्वाच्या फौजदारी कायद्यांची ओळख अन् माहिती या पुस्तकातून वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. विविध चळवळींत कार्यरत असणारे कार्यकर्ते, तुम्हा–आम्हासारखी सामान्य माणसं यांना हा ऐवज निश्चितच उपयुक्त ठरेल. हे केवळ एक संग्राह्य पुस्तकच नाही, तर अडीअडचणीच्या वेळी मदतीला हाताशी असणारी एक संरक्षक ढाल आहे, असं म्हणता येईल.

 

Additional information

लेखक

सुनील दिघे

मुखपृष्ठ

सरदार जाधव

संपादक

मिलिंद चंपानेरकर

बांधणी

paperback

ISBN

978-81-989061-6-8

पृष्ठसंख्या

232

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपण नागरिक, आपले कायदे | सुनील दिघे |”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com