Additional information
संपादक | अभिजित देशपांडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 198 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
डहाके हे लघुनियतकालिक चळवळीतले एक महत्त्वाचे शिलेदार आणि कवी आहेत, तथापि या चळवळीत पुढे पंथ-प्रवाह निर्माण होऊनही डहाके त्यापासून अलिप्त राहिले, कुठल्याही व्यक्तिवादी अथवा वैचारिक / सामाजिक गटा-तटाशी ते बांधळे गेले नाहीत. त्यांचा ओढा मार्क्सवादाकडे, डाव्या विचारसरणीकडे असला, तरी त्यांचे लेखन त्यासाठी आणि त्यापुरते ‘प्रचारकी’ कधीच झाले नाही. वेगळा वाङ्मयीन सुभाही त्यांनी कधीच निर्माण केला नाही. डहाके यांची कविता व्यक्तिवादी आणि तरीही वर्तमान भोवतालाशी बांधलेली राहिली. साठोत्तरी परंपरेतले त्यांचे हे वेगळेपण आवर्जून नोंदण्यासारखे आहे.
कविता हा बराचसा आत्मकेंद्रित आणि बहुशः वैयक्तिक पातळीवर राहणारा असा वाङ्मयप्रकार आहे. डहाक्यांच्या कवितेत वैचारिक / सामाजिक-राजकीय भोवतालाची जटिलता व्यक्त होऊनही मूलतः ती अंतर्मुख वृत्तीचीच आहे. या मर्यादित अर्थानेच, ती व्यक्तिलक्ष्यों आहे, असे म्हणता येईल. भोवतालाच्या तपशिलांचे दर्शन त्यात थेटपणे येत नाही. १९६०च्या पिढीचा विफलतेचा अनुभव, नंतरची आणीबाणी, नव्वदनंतर एकीकडे जागतिकीकरणाने पोखरलेले जगणे आणि दुसरीकडे धार्मिक-जातीय दंगलींनी सर्वत्र घातलेले थैमान, दहशतवाद-आतला. बाहेरचा – या सर्वाचा अपरिहार्य संदर्भ त्यांच्या कवितांना आहे, पण त्यानिमित्ताने डहाक्यांना पडणारे प्रश्न तात्त्विक आहेत, एकूण मानवी जगण्याशी करुणार्ततेने जोडलेले आहेत.
– अभिजित देशपांडे ( प्रस्तावनेतून )
संपादक | अभिजित देशपांडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 198 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.