Additional information
संपादक | सतीश कामत |
---|---|
पृष्ठसंख्या | 120 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
अवकाळी पाऊस हा खरेतर शेतकऱ्यांचा घात पाऊस आहे. तो शेतकऱ्यांच्या जीवनातला रस शोषून, आत्मघाताला प्रवृत्त करतो. हे गाव खेड्यातल्या कृषिवलांचं जीवनवास्तव आहे. आनंद विंगकर यांनी हेच कुणबी भूपाळांचं जगणं अचूकपणे आणि सूचक पद्धतीने ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ या कादंबरीत मांडलं आहे. या समस्याप्रधान कादंबरीची अनेक अभ्यासक-समीक्षकांनी नोंद घेतली आहे. नियतकालिकांतून अभ्यासपूर्ण लेख लिहून कादंबरीची मौलिकता सिद्ध केली आहे. हा सर्व अभ्यास डॉ. सतीश कामत यांनी ‘अवकाळी पावसाच्या निमित्ताने या संपादित ग्रंथात एकत्र केला असून तो जिज्ञासूंकरता उपयुक्त ठरणार आहे. डॉ. कामत यांनी घेतलेले परिश्रम व जोपासलेली समीक्षादृष्टी यामुळे प्रस्तुत ग्रंथाची ठळक नोंद घेतली जाईल, यात शंका नाही.
– किशोर सानप
संपादक | सतीश कामत |
---|---|
पृष्ठसंख्या | 120 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.