Additional information
लेखक | आनंद विंगकर |
---|---|
पृष्ठसंख्या | १५४ |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
कवी आनंद विंगकर यांची ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही कादंबरी एक अकस्मात घडलेली घटना आणि एक अस्मानी संकट यांच्या छायेत सुरु होते. अस्मानी संकटामागच्या मानवी हस्तक्षेपांचं भान देत, अकस्मात उद्भवलेल्या घटनांच्या मालिकांची अपरिहार्य शोकात्म परिणती दिग्दर्शित करत त्या वातावरणातील बदलते मानवी भाव, मानवी जिजीविषा, कणखरपणा यांचा गंभीर प्रत्यय देते. रंजकतेच्या पारंपरिक कुप्रथांचा त्याग करूनही ही कादंबरी अत्यंत वेधक उतरली आहे. कारण लेखकाचं वृत्तिगांभीर्य आणि भावनात्मक ताटस्थ्य. आत्महत्या करणारं शेतकरी जोडपं, त्यांची थोरली लेक, तिचा प्रियकर यांची चरित्र आणि एकूण कथानकाचं वाहतेपण प्रभावी आहेच, खेरीज ग्रामसमाजातील व्यवहार, परस्परसंबंधांचे ताणेबाणे यांच्यातील अस्सलतेमुळे ही कादंबरी अधिक मोठा आवाका धारण करते. कादंबरी वाचून संपवताना आपण ती वाचण्याआधीचे उरात नाही, हे तिचं महत्त्वाचं यश आहे.
– रंगनाथ पठारे
लेखक | आनंद विंगकर |
---|---|
पृष्ठसंख्या | १५४ |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.