लोकवाङमय गृह

Shop

अधांतर : भूमी व अवकाश । संपादक : राजू देसले

Original price was: ₹600.00.Current price is: ₹510.00.

एकीकडे तेंडुलकर, एलकुंचवार, आळेकर आणि दुसरीकडे समजा दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, संजय पवार अशा दोन वेगवेगळ्या सशक्त समकालीन नाट्यधारा मानायच्या ठरल्या तर जयंत पवार या दोन्ही धारांना एकत्र आणून त्यांच्यात अर्थपूर्ण भर घालणारे श्रेष्ठ नाटककार ठरतात. नाटकांच्या संख्येचा विचार करता या सगळ्यांच्या तुलनेत जयंत पवार हे कमी लिहिणारेच दिसतात. शिवाय या बाकी सगळ्यांनी या ना त्या प्रकारे संहितेतील आशय प्रकटीकरणासाठी काही प्रयोगशील रस्त्यांचे संकेत सुद्धा निर्देशित केले आहेत. जयंत पवार यांना ते करावे लागले नाहीत किंवा त्यांना तितकी सवडही मिळाली नसेल. किंवा खरे तर त्यांच्या लेखनातील आशय हाच त्यांच्या मनात सतत इतका खच्चून भरलेला असेल की त्यात बाकी कशाला संधीच मिळाली नसेल. जयंत पवार यांच्या नाटकांची मौलिकताच मुळी अशा खच्चून भरलेल्या मुद्देमालात आहे. त्यांचे नाटक चोहो बाजूंनी अंगावर येते आणि आपल्याला घेरून टाकत एका अस्वस्थ हतबलतेचा प्रत्यय देते. त्यांचा गाजलेल्या ‘अधांतर’ या नाटकावर विविध अंगांनी प्रक्षेपण करणारे, संहिता आणि प्रयोग यांचा विचार करून अनेक दिशांनी धांडोळा घेणारे मान्यवरांचे लेख राजू देसले यांनी ‘अधांतर : भूमी व अवकाश’ या ग्रंथात एकत्र संपादित करून एक फार महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज आपल्यासाठी समोर आणला आहे. अभ्यासकांसाठी आणि इतर वाचकांसाठी सुद्धा तो मोलाचा ठरेल, हे निश्चित होय.
– रंगनाथ पठारे

Additional information

संपादक

राजू देसले

पृष्ठसंख्या

440

बांधणी

हार्डकव्हर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अधांतर : भूमी व अवकाश । संपादक : राजू देसले”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us