Additional information
लेखक | केशव मेश्राम |
---|---|
पृष्ठसंख्या | 118 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
.. अभिमनच्या ट्रॅजिडीतून अजूनही बाहेर पडलो नाही. मला पुस्तकातल्या पाननूपानाने घट्ट धरून ठेवले होते. जे पुस्तक आपल्या मानगुटीला बसते ते चांगले अशी माझी चांगल्या पुस्तकाची एक साधीसुधी व्याख्या आहे. मानगुटीला बसणाऱ्या गोष्टी अस्वस्थ करीत असतात. शांताबाईंनी म्हटल्याप्रमाणे तुमची लेखनातली अलिप्तता विलक्षण परिणामकारक आहे. दलितपणाची मुद्रा जितकी वैचारिक / सामाजिक व्यवहारात विकृत तितकीच साहित्यातही. शेवटी साहित्य ही कृती आहे, विकृती नव्हे ! स्वार्थ- सत्तामद- आंधळ्या धर्मसमजुती अशा नाना कारणांनी विकृत झालेल्या समाजाकडून अन्यायाखेरीज काहीच पदरात पडू न शकणाऱ्या माणसाला त्या विकृतीचे बळी होऊन जगावे लागते. त्या विकृतीच्या चित्राला कलात्मक घाट देताना कलावंताला आपल्या दुःखाची आणि संतापाची आग देऊन शेवटी एक मूर्तीच घडवावी लागते. ते सारे दुःख आणि संताप, ते अन्याय, ती निराशा, ती अगतिकता हे सारे त्या मूर्तीच्या दर्शनाने दिसायला हवे. तुम्ही हे सारे दर्शन घडवताना जो एक विलक्षण कोरडेपणा दाखवला आहे तो अंतःकरणाला घरे पाडून जातो. खूप मोठेपणाने तुम्ही ह्या दोन्ही दीर्घ कथा लिहिल्या आहेत. हा नुसता मनाचा मोठेपणा’ नव्हे. त्यात सूक्ष्म अशी अहंकाराची भावना असते. मी म्हणतो तो मोठेपणा कलावंताला आवश्यक असणारा माणसाच्या साऱ्या व्यापारांचा, सहज निर्माण होणाऱ्या रागलोभापलीकडे जाऊन शोध घेणारा. तुमचे पुस्तक वाचताना मला गोर्कीच्या आत्मचरित्रपर लिखाणाची आठवण झाली.
अशी सांदीकोपऱ्यात पडलेली, sub-human स्तरावर जगणारी माणसं, ज्यांना न्याय हक्क देणे तर बाजूलाच राहू द्या, ज्यांचे अस्तित्वसुद्धा मान्य व्हायला इतकी वर्षं लागली आणि अजूनही ते तसे लक्षांशानेही मान्य झाले नाही, अशा जीवनाचे असे वेधक, पण त्याबरोबरच नाटकी भावनावशतेपासून अलिप्त असे दर्शन वाचकाला अंतर्मुख करते. हकिगत सांगणारा तुमचा नायक दुःखाचा पाढा वाचत नाही. आपण जगत आहोत ते माणसाचे जगणे नव्हे, याचीदेखील जिथे जाणीव झालेली नाही अशा जीवनाची चित्रे रेखाटीत जातो. तो लोकविलक्षण मनुष्यप्राण्यांचा समुदाय कुठेतरी आहे ह्याची पुसट जाणीव असणाऱ्यांच्या घरांत आणून ती माणसे सोडतो. त्या माणसांशी आपण आणखी बराच वेळ बोलत राहायला हवे असे वाटायला लावतो…
…तुमच्या पुस्तकातील माणसे माझ्या मनी वस्तीला उतरली. हे केवळ उपेक्षितांचे अंतरंग नाही. चांगली कथा किंवा कादंबरी ज्या अर्थाने अंतरंगाचे दर्शन घडवते त्या अर्थाने तुमच्या कथेतल्या माणसाचे इथे अंतरंग दिसते. ललित साहित्यात पात्रांच्या पेठा कुठल्या हा प्रश्न अगदी गौण आहे. त्यातली माणसे आपल्याला किती कडकडून भेटतात, झोंबतात किंवा छळतात हे महत्त्वाचे. अरविंद गोखल्यांच्या मंजुळेने जसे मला छळले आहे तसाच तुमचा अभिमन छळणार आहे…
पु. ल. देशपांडे यांच्या एका पत्रातून
लेखक | केशव मेश्राम |
---|---|
पृष्ठसंख्या | 118 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.