Additional information
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 114 |
बांधणी | पेपरबॅक |
₹110.00
या पुस्तकाचे दोन भाग पडतात. पहिल्या भागातील सहा प्रकरणांत, म्हणजे ७५ पानांत, तात्त्विक चर्चा आहे; दुसऱ्या भागातील पाच प्रकरणांत, म्हणजे पुढील ७६ पानांत, प्रत्यक्ष समीक्षणे आहेत. या दोन्ही भागांतील विवेचनासंबंधी, विशेषत: त्याच्या मर्यादांसंबंधी, थोडी प्रस्तावना जरूर आहे.साहित्याची पौर्वात्य व पाश्चात्त्य लक्षणे प्रथम तपासून ‘आनंद’, ‘सौंदर्यबोध’ इत्यादी प्रयोजनांचा विचार व साहित्यनिर्मितीच्या मुळाशी असलेल्या ‘प्रतिभा’ इत्यादी कारणांची चर्चा नेहमी केली जाते. या अभ्यासाच्या पायावर समीक्षेचा उद्देश व व्याप्ती आणि समीक्षाशास्त्रातील संप्रदाय व वाद यांचा ऊहापोह केला जातो. या एकंदर विवेचनात संस्कृत साहित्यशास्त्रातील रस, ध्वनी, अलंकार इत्यादी तत्त्वांचा विचार गोवला जातो.
‘रस’, ‘भाव’, ‘ध्वनी’ इत्यादी महत्त्वाची शास्त्रीय प्रमेये भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी मांडली व त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे. त्यांची खरी ओळख अर्थात हवीच; पण दुर्दैवाने असे झाले आहे की संस्कृत आधुनिक मिश्रित कथा बनविण्याचे प्रयत्न करून आपण मराठीचे साहित्यशास्त्र दुबळे मात्र केले आहे. आधुनिक मानसशास्त्रीय प्रमेय जुन्या ‘रसभावादी’ तत्त्वांवर लादून त्यांचे संस्कार करण्याचा प्रयत्नांच्या मागे जुन्याबद्दल अभिमान आहे असे म्हटले, तरी त्यास प्रयत्नांमुळे जुन्या तत्त्वांचे विडंबन होण्यासच आतापर्यंत मदत झाली आहे. हे थांबावयास हवे असेल तर संस्कृत साहित्यशास्त्रीय तत्त्वांचा फेरविचार केला पाहिजे. आधुनिक मानसशास्त्राऐवजी प्राचीन भारतीय दर्शनांशी व एकंदर विचारविश्वाशी त्यांचा अन्वय व एकरूपता आहे हे लक्षात घेऊन त्यांचा आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वांपासून वेगळा विचार केला पाहिजे. ‘रससिद्धान्ता’चे विवेचन या दृष्टीने मी केलेले असून तेच विस्ताराने व स्वतंत्र पुस्तकरूपाने लवकरच वाचकांपुढे ठेवणार आहे. म्हणून तो विषय प्रस्तुत पुस्तकातून वगळलेला आहे.
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 114 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.