लोकवाङमय गृह

Shop

समग्र निरीश्वरवाद । शरद बेडेकर

Original price was: ₹220.00.Current price is: ₹200.00.

सगळे धर्म वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळात व परिस्थितीत निर्माण झालेले असल्यामुळे नीती, कर्मकांड, उपासना व तत्त्वज्ञान या धर्माच्या चारही अंगांत धर्माधर्मांमध्ये अतोनात फरक पडले व त्यामुळे प्रत्येक धर्म वेगवेगळ्या चबुतऱ्यावर उभा ठाकला. तसेच प्रत्येक धर्मीयाला जबरदस्त स्वधर्माभिमान शिकवण्यात आल्यामुळे त्यातून धार्मिक अहंकार व पुढे काहीजणांना अध्यात्माची झिंग/नशा येणे शक्य झाले व तशी ती सर्व धर्मीयांमध्ये येऊ लागली. कधी कधी ही झिंग परधर्मीयाला मारणे वा त्याला त्रास देणे हे धर्मकृत्य आहे असे मानण्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचते, असे जगाचा इतिहास सांगतो. अध्यात्माची झिंग जशी व्यक्तीला येते तशी ती संपूर्ण समाजाला वा राष्ट्रालाही येऊ शकते आणि त्यामधून भयंकर विनाशकारी दंगे, युद्धे, अतिरेकी उच्छाद घडून येतात. असा हा अहंकार आणि अशी ही विविध पातळ्यांवरची धार्मिक झिंग अनेकांच्या मनात लहानपणीच भिनलेली असल्यामुळे मानवी हितासाठी त्यावर काही उपाय शोधणे व ते अमलात आणणे जरूर आहे. तसे न केल्यास कदाचित सारी मानवजात धोक्यात येऊ शकेल.
अध्यात्माची झिंग निपटून काढण्यासाठी ‘निरीश्वरवादाचा सर्वांनी मनापासून स्वीकार करणे’ हा उपाय नक्कीच परिणामकारक ठरू शकेल. परंतु प्रत्यक्षात तसे घडून येणे नजीकच्या भविष्यकाळात तरी मुळीच शक्य नाही. शिवाय मानवजातीला आपली अध्यात्माची झिंग उतरवण्यासाठी तो एकच उपाय आहे असेही मुळीच म्हणता येणार नाही. अज्ञेयवादातूनही ते शक्य होऊ शकेल. किंवा ईश्वराच्या अस्तित्वाच्या वादात न पडता फक्त विज्ञाननिष्ठ व बुद्धिप्रामाण्यवादी विचारांचा जीवनात सातत्याने अवलंब करून मानवी समाज आपली अध्यात्माची झिंग उतरवू शकेल.

Additional information

लेखक

शरद बेडेकर

पृष्ठसंख्या

152

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समग्र निरीश्वरवाद । शरद बेडेकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com