Additional information
लेखक | गं. बा. सरदार |
---|---|
पृष्ठसंख्या | 146 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भात त्या काळातील गरजेनुसार आपली भूमिका मांडली तेव्हा ऐतिहासिक साधने पुरेशी उपलब्ध नव्हती. तसेच साहित्य व समाज यांतील संबंधाविषयीची नेमकी सैद्धान्तिक भूमिकाही मराठीला तशी अपरिचितच होती. (रानडे यांना त्यांच्या विवेचनासाठी त्याची आवश्यकताही नव्हती.) गं. बा. सरदार यांच्या प्रस्तुत पुस्तकातील भूमिका बहुतांशी तीच असली तरी त्यातील विवेचनामागे वस्तुवादी इतिहासमीमांसाचे नेटके भान आहे…
…मध्ययुगीन महाराष्ट्राची समाजरचना कशी होती; या समाजरचनेत ब्राह्मणांचे स्थान काय होते, याचे साधार स्पष्टीकरण करून त्या काळात आर्थिक गुलामगिरीपेक्षा बहुजन समाजाची मानसिक गुलामगिरीच कशी महत्त्वाची होती हे दाखवून, ही मानसिक गुलामगिरी शिथिल करण्याचे कार्य संतांनी कसे केले हे अनेक उदाहरणे देऊन साधार व सुसंगतपणे सरदारांनी दाखवून दिले आहे. त्याचबरोबर युरोप आणि भारत येथील धर्मसत्तांचे स्वरूप कसे भिन्न होते, दोन्ही समाजरचनेच्या स्वरूपात कसा वेगळेपणा होता याचे विवेचन करून युरोपमध्ये झाले तसे एतद्देशीय प्रबोधनाचे परिणाम का झाले नाहीत हे स्पष्ट करताना संतांच्या सामाजिक कार्याला असणाऱ्या काळाच्या मर्यादाही या पुस्तकात सरदारांनी दाखवून दिल्या आहेत. संत साहित्याच्या सामाजिक फलश्रुतीविषयीचे सरदारांचे निष्कर्ष न्यायमूर्ती रानड्यांच्या निष्कर्षांशी सुसंगत असले तरी या पुस्तकात त्या निष्कर्षांची मांडणी एका सैद्धान्तिक दृष्टिकोनातून झालेली असल्यामुळे संत साहित्याच्या सामाजिक कार्यासंबंधीचा विचार त्या दृष्टीने पुढे नेण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे झाला आहे असे म्हणता येते.
‘संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ या पुस्तकातील विवेचनामागे असणारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाविषयीची आस्था, आपल्या भूतकाळाकडे पाहण्याची उदार व समतोल दृष्टी आणि स्पष्टता यामुळे हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. विशिष्ट भूमिकेतून इतिहासाचा व साहित्याचा विचार करताना मराठी समाजात संत साहित्याविषयी जी मतमतांतरे निर्माण झाली होती; त्या सर्व मतमतांतरांचा विधायक ऐतिहासिक दृष्टिकोनातून झालेला जणू समारोप असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
( प्रस्तावनेतून )
लेखक | गं. बा. सरदार |
---|---|
पृष्ठसंख्या | 146 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.