Additional information
संपादक | प्रदीप कर्णिक |
---|---|
पृष्ठसंख्या | 252 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
विवेक मोहन राजापुरेच्या कथांमधील अस्सलपणा इतका प्रत्ययकारक आहे, की त्याने लिहिलेला प्रत्येक विषय त्याने स्वतः जगून पाहिल्यासारखा वाटतो. त्याचे कथाविषय इतके विविध आणि जीवनाच्या परस्परविरोधी अंगाने जाणारे आहेत की, माझ्यासारख्या चाकोरीबद्ध, खास मध्यमवर्गीय माणसाला त्याच्या संवेदनक्षम जगण्याचा हेवा वाटायला लागतो; नव्हे, वाटत राहतो. तो जर मला भेटता तर मी लाजलज्जा सोडून सरळच त्याला प्रश्न केला असता की, “तू कसा जगतोस? इतके सगळे अनुभव इतक्या अस्सलपणे मांडता येणे ही गोष्ट सारे अनुभव जगून घेतल्याशिवाय शक्यच नाही. आणि असे जर नसेल तर तुझ्या मेंदूत शिरून पाहणे आवश्यक आहे.” इतकी उदंड कल्पनाशक्ती माझ्या पाहण्यात फारच क्वचित आली आहे. त्याच्याबरोबरीने त्याच्या विश्वात हिंडून येण्याचा आग्रहही मी त्याच्याकडे केला असता.
(विवेकच्या कथा) वाचून झाल्यावर डोक्यात विचार येतो, हे याला कसे जमले? इतका धीर आणि मोकळेपणा याच्यात कसा आला? लिहिताना सतत सांभाळून लिहिणाऱ्या’ माझ्यासारख्या कातडीबचावू मंडळींना, आमच्या तथाकथित ‘सूचकतेची’ लाज वाटावी असे तो, कुठलीही भीडमुर्वत न ठेवता, बेदरकारपणे, पण अस्सल प्रामाणिकपणे लिहीत राहतो. भाषेवर त्याची विलक्षण हुकूमत जाणवते. आणि अचंबित होण्याशिवाय आमच्या हाती काही राहत नाही.
– प्रिया तेंडुलकर
संपादक | प्रदीप कर्णिक |
---|---|
पृष्ठसंख्या | 252 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.