Additional information
लेखक | सतीश काळसेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 292 |
बांधणी | हार्डकव्हर |
Original price was: ₹350.00.₹300.00Current price is: ₹300.00.
२०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ !
काळसेकरांच्या रोजनिशीत साहित्य म्हटले की त्यात वृत्तपत्रे येतात, नियतकालिके येतात, अनियतकालिके येतात, विशाल ग्रंथराज येतात, कितीतरी विविध प्रकारचे लेखन येते. लोकभाषा आणि प्रमाण भाषा ह्या विषयी चर्चा येते. समाजातले अगदी तळागाळापासूनचे अनेक स्तर येतात. लोकभाषेवरच्या त्यांच्या प्रेमात लोकांवरचे प्रेम दिसून येते. आणि लोकांवरचे प्रेम ह्या गुणाला त्यांच्या मार्क्सवादातील सामाजिक जाणीव कारणीभूत आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण काही माणसांत प्रेम करायची आणि ते मिळवण्याची शक्ती असते. ती कुठल्याही विचारसरणीवर अवलंबून नसते. काळसेकरांच्यात ती शक्ती आहे.
मी १९६३च्या सुमारास काळसेकरांच्या डोंबिवलीच्या जागेत गेलो होतो, त्यांच्या संसाराला नुकतीच सुरुवात होत होती. फर्निचर अगदीच बेताचे होते. मुख्यत्तः जिथे जागा मिळेल तिथे पुस्तके होती. सुमारे पंचेचाळीस वर्षांनी मी त्यांच्या पेणच्या जागेत गेलो होतो. डोंबिवलीत असलेल्या लहानशा ग्रंथसंग्रहाचा विशाल ग्रंथवृक्ष झाला आहे. त्याला एका खोलीत डेरेदार बुंधा आहे आणि त्याच्या पारंब्या बाकीच्या सर्व खोल्यांत पसरल्या आहेत. त्याच्या फांद्यांवर आंबेडकरांपासून वेदांपर्यंत, मार्क्सपासून नित्शेपर्यंत आणि तुकारामापासून अरुण कोलटकरांपर्यंत मंडळींची मांदियाळी आहे. ह्या वृक्षाच्या सावलीत आज काळसेकर पतिपत्नी राहताहेत. मुंबईला यायला दोघेही राजी होत नाहीत, तेही रास्तच आहे.
– अरुण खोपकर
लेखक | सतीश काळसेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 292 |
बांधणी | हार्डकव्हर |
Reviews
There are no reviews yet.