Additional information
अनुवाद | डॉ. गोरख काकडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 112 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹180.00.₹150.00Current price is: ₹150.00.
देशात राजकीय, धार्मिक अराजकता व आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात फोफावली आहे आणि देश एकाधिकारशाहीकडे, डिक्टेटरशिपकडे वाटचाल करत आहे. संविधानिक मूल्यांची येन-केन प्रकारे पायमल्ली होत असल्याचा क्षणों-क्षणी प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाधित होताना पाहायला, अनुभवायला मिळते. विशिष्ट धार्मिक संघटना, समूह धर्माच्या नावावर, ऐक्याच्या नावावर आपल्या ध्येय-धोरणांना सामान्य माणसाच्या गळी उतरवण्याचा जोरकस प्रयत्न करत आहेत. फॅसीझम बळावत आहे. ‘हम करे सो कायदा’ मनोवृत्तीने कित्येकांचे प्राण घेतले, कित्येकांना कारागृहात टाकले. अशा एक ना अनेक घटना देशात घडत आहेत. देशाला इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता पटवण्याचा केविलवाणा प्रयत्न ही काही प्रतिगामी विचारधारा, प्रवृत्ती करु पाहत आहेत. त्यांना अपेक्षित असा राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य देशावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितींमध्ये ‘राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल अशी अपेक्षा ठेवूनच याचा हिंदीतून मराठी अनुवाद सुज्ञ वाचकांसाठी प्रस्तुत करत आहोत. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य या संकल्पना स्पष्टपणे मांडते, फॅसीझमची ओळख, त्याची आयुधे वाचकांसमोर प्रकट करते.
अनुवाद | डॉ. गोरख काकडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 112 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.