Additional information
लेखक | रामचंद्र नलावडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 150 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
सरकारी खात्याशी जनतेचा नित्याचा संबंध येत असतो. इंग्रजी अमदानीपासून लाल फितीत अडकलेल्या या खात्याची स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांनंतरही सुटका झालेली नाही. उलट ते जनतेपासून अधिकाधिक तुटत गेले. तिथली अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, मनमानी, दिरंगाई यामुळे एकंदरीतच या खात्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात रोष आणि तिरस्कारच असतो. पण हे बाहेरून पाहणाऱ्याचे झाले. प्रत्यक्षात या खात्यातील लोकांचे आपापसातील संबंध, ताणतणाव, हेवेदावे, नोकरशाही उतरंड व पक्षपात कसे असतात; वेगवेगळ्या हितसंबंधांचे टकराव आणि संघर्ष कसे असतात याचे आतून घडणारे दर्शनही अस्वस्थ करणारे असते. अशा वातावरणात काही मूल्यांवर निष्ठा ठेवत प्रामाणिकपणे काम करणे हा मोठा संघर्षच असतो.
खेड्यापाड्यांतील लोकांचा शासकीय व्यवहाराशी घनिष्ठ संबंध असणारे खाते म्हणजे महसूल खाते व तहसील कचेरी. या खात्यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे भान ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाची होणारी कुचंबणा, घालमेल व आलेले बरेवाईट अनुभव याचे प्रत्ययकारी चित्रण म्हणजे ही कादंबरी.
– अविनाश कदम
लेखक | रामचंद्र नलावडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 150 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.