Additional information
लेखक | वीरधवल परब |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹125.00.₹110.00Current price is: ₹110.00.
समकालीन व्यवस्थेत आपण वेगवेगळ्या प्रकारे ‘नालायक’ आहोत, तिच्यापासून तुटलेले आहोत, आपले या व्यवस्थेतील जगणे या अर्थाने निरर्थक आहे, ही परात्मतेची यातनामय जाणीव वीरधवल परब यांच्या ‘दरसाल दर शेकडा’ या काव्यसंग्रहाच्या केंद्रस्थानी आहे. समाजवादी दृष्टीच्या संवेदनशील कविमनाला समकालीन वैचारिक / सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय व्यवस्था मूल्यविहीन झाल्याची जाणीव अस्वस्थ करते. जागतिकीकरणाच्या रूपाने आलेली सर्वंकष भांडवलशाही व्यवस्था आणि धर्माच्या नावाने अंधश्रद्धा जोपासणाऱ्या व्यवस्था या गोष्टींमुळे सर्वसामान्यांचे खच्ची होणारे, स्वत्वहीन होणारे जीवन कवीच्या प्रत्ययाला येते. या सर्व क्षेत्रांतील, व्यवस्थांमधील विविध अंतर्विरोध, ताण, विसंगती कवी आपल्या खास तिरकस, औपरोधिक भाषेत भेदक रीतीने मांडतो. या सर्व पोखरल्या गेलेल्या व्यवस्था अर्थपूर्ण करण्यास, त्यांना आकार देण्यास आपण असमर्थ आहोत, याबद्दलची हतबलता, अगतिकता, आकांत ही कविता आविष्कृत करते. एका अर्थाने ही कविता म्हणजे स्वसंस्कृतीची आणि आपल्या स्वतःच्या हतबलतेची केलेली कठोर चिकित्सा आहे.
समकालीन व्यवस्थेबद्दल बोलताना ही कविता प्रायः या व्यवस्थेशी निगडित अनेकविध तपशिलांमधून आपल्यासमोर येते. हे सर्व तपशील कवीच्या आत्मजाणिवेचा अपरिहार्य भाग असल्यामुळे ते काव्यात्म रूप धारण करतात. आपल्या परिसरातील गोष्टींना, घटितांना कवी देत असलेले प्रतिमात्मक व प्रतीकात्मक रूप आणि याच परिसरातील संकेतांचा व भाषेचा कवितेत केलेला अर्थवाही उपयोग यांमुळे या कवितेला वैशिष्ट्यपूर्णता प्राप्त झालेली आहे
– वसंत पाटणकर
लेखक | वीरधवल परब |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.