Additional information
लेखक | उद्धव कांबळे |
---|---|
पृष्ठसंख्या | 324 |
बांधणी | हार्डकव्हर |
Original price was: ₹350.00.₹300.00Current price is: ₹300.00.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स या दोघांनीही दलित, शोषित व श्रमिकांच्या मुक्तीचे आणि त्यांच्या उत्थानाचे विचार सांगितले. त्यांच्यासाठी ते अहोरात्र आणि आयुष्यभर झटले. त्यामुळे या दोघांचेही विचार दलित शोषितांच्या मुक्तीसाठी, उत्थानासाठी परस्पपूरक आहेत. ते परस्परविरोधी व परस्परांना मारक तर मुळीच नाहीत. असे असूनही भारतीय कम्युनिस्टांचे जातिव्यवस्थेचे आकलन व कार्य यावरून दलितांमध्ये एक प्रकारची नाराजी व विसंवाद आहे. पण भारतीय कम्युनिस्टांचे यशापयश आणि कार्ल मार्क्सचा विचार, मार्क्सवादी विचारसरणी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्सचे विचार व मार्क्सवादी, समाजवादी विचारसरणी यांच्या संयोगातून तसेच भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी व समाजवादी विचारसरणीचे पक्ष व संघटना यांच्या सहकार्याने दलित शोषितांच्या उत्थानाचा, मुक्तीचा लढा अधिक जोमदार, अधिक क्रांतिकारी करता येईल, या विश्वासातून एक सकारात्मक व आश्वासक मांडणी करण्याचा हा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
लेखक | उद्धव कांबळे |
---|---|
पृष्ठसंख्या | 324 |
बांधणी | हार्डकव्हर |
Reviews
There are no reviews yet.