Additional information
संपादक | वसंत सरवटे |
---|---|
पृष्ठसंख्या | 252 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
टाकसाळे यांच्या १९९१ मध्ये प्रकाशित झालेल्या टाकसाळीतील नाणी या कथासंग्रहासाठी मी मुखपृष्ठ व कथाचित्रं केली. हा त्यांचा माझा साहित्यातील पहिला सहप्रवास आणि अगदी अलीकडे म्हणजे २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या राधेनं ओढला पाय या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ मी केलेलं आहे. म्हणजे आमचा सहप्रवास दोन दशकांचा आहे. एवढ्या दीर्घ प्रवासानंतर आज विशेष म्हणून सांगावी अशी गोष्ट ही की, सुरुवातीच्या काळात मराठीतील लक्षवेधी उत्तम विनोदी लेखकांमध्ये गणना करावी लागेल असा हा लेखक आहे अशी जी प्रतिक्रिया होत होती ती आजपर्यंत तशीच कायम राहिली आहे.
टाकसाळ्यांच्या लिखाणाला, मग ती कथा असो किंवा वृत्तपत्रांतील स्फुट सदर, विनोदाचं अस्तर चिकटून आलेलं असतं आणि है। अस्तर मानवाबद्दलच्या विशाल सहानुभूतीच्या धाग्यांनी विणलेलं असतं. त्यांच्या मनात समाजाबद्दल जागृत जाणीव आहे. समाजव्यवहाराकडे पाहण्याची त्यांची भूमिका कोणताही राजकीय पक्षविरहित, समंजस अशी आहे. स्वतंत्रपणे चिकित्सक आहे. व ती ते आपल्या लिखाणातून निर्भयपणे मांडतात. त्यांच्या सर्वच लिखाणामागे संवेदनाक्षम, प्रागतिक, चिकित्सक दृष्टिकोन जाणवतो.
– वसंत सरवटे (प्रस्तावनेतून)
संपादक | वसंत सरवटे |
---|---|
पृष्ठसंख्या | 252 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.