Additional information
लेखक | रा. भि. जोशी |
---|---|
पृष्ठसंख्या | 144 |
बांधणी | पेपरबॅक |
₹60.00
श्री. रा. भि. जोशी हे मराठी साहित्यप्रांतात त्यांच्या लक्षणीय ललितलेखनासाठी ओळखले जातात. त्यांच्या ललितलेखनातही त्यांचे इतिहासाचे भान, सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास लेखकाची एक वेगळी ओळख देतो. श्री. जोशींचा वेगळेपणा त्यांच्या सातत्याने केलेल्या वैचारिक / सामाजिक लेखनात दिसतो. ‘जीवनाचे झरे’ मधील लेखन वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांतून वेळोवेळी झालेले आहे. या लेखनामागचे निमित्त तात्कालिक आहे; पण लेखकाची वृत्ती मात्र एका विषयाचा ध्यास घेणारी आहे..
विविध धर्माची माणसे नागर जीवनात एकत्र राहतात त्या वेळी निर्माण होणारे प्रश्न हा त्यांच्या संवेदनाक्षम ध्यासाचा विषय होता. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात धर्मनिरपेक्ष असणारे ‘रा.भि.’ (मराठी वर्तुळात ते याच नावाने ओळखले जात) जन-सामान्यांना धर्म हा गाभ्याचा विषय वाटतो हे मान्य करून धर्माचा अभ्यास करतात. त्यांना संस्कृत, उर्दू, इंग्रजी या भाषा उत्तम अवगत असल्याने त्यांच्या विचाराला, लेखनाला एक विस्तृत संदर्भ परिसर लाभलेला आहे. ‘रा.भि.’चे उदारमतवादी संस्काराने घडलेले सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, निकोप नागरी जीवनाविषयीची आस्था आणि साहित्यापलीकडे असलेला इतिहास, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र या मानव्य शाखांचा व्यासंग यामुळे या स्फूट लेखनामागे सलग मूल्यभावना आहे.
लेखक | रा. भि. जोशी |
---|---|
पृष्ठसंख्या | 144 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.