Additional information
लेखक | रवींद्र इंगळे चावरेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
धर्म, संस्कृती आणि अध्यात्म हे रूढ अर्थाने कवितेच्या, त्यातही एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात लिहिल्या जाणाऱ्या कवितेच्या कक्षेत येणारे विषय नाहीत. परंतु रवींद्र इंगळे चावरेकर यांचे ते अभ्यासाचे, आस्थेचे विषय असल्याने त्यांच्या कवितेलाही व्यापून आहेत. असे असले तरी त्यांना समकालाचे यथार्थ भान आणि बदललेल्या वास्तवाची परिपूर्ण जाण आहे. त्यामुळेच त्यांनी महाभारतातील पात्रांना ग्लोबलायझेशनच्या आजच्या काळाच्या परिभाषेत आणि आजच्या काळाच्या संदर्भातच बोलते केले आहे.
व्यक्तिगत आणि सार्वजनिक जगण्यात ढासळत चाललेली नीतिमत्ता, आत-बाहेर होत चाललेला मूल्यहास आणि वर्तमानातल्या तत्त्वहीन, सत्त्वहीन वास्तवात भोवंडून जाताना काहीच कळत नाही मला’ असे कवी म्हणत असला तरी कवितेतून काय आणि कशा प्रकारे व्यक्त करायचे हे मात्र त्यांना नेमकेपणाने कळले आहे.
चावरेकरांच्या कवितेत काळाची अनेक रूपे एकाच वेळी कवेत घेण्याचे सामर्थ्य असून काळाच्या प्रदीर्घ परिघात परिक्रमा हे तिचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. चकित करणारा विरोधाभास हा या कवितेचा पृथगात्म घटक म्हणता यावा इतक्या विविध अंगांनी संग्रहभर विखुरला आहे. ‘ग्लोबलोपनिषद’ हे संग्रहाचे शीर्षकही त्याचेच द्योतक आहे.
परंपरा आणि आधुनिकता, विज्ञान आणि अध्यात्म, लालसा आणि विरक्ती, वैचारिक / सामाजिकता आणि आत्मकेंद्रितता अशा परस्परविरोधी टोकांपर्यंत पसरलेली मानवी अस्तित्वाची मुळे कवी उकरून पाहतो आणि या सर्जनशील प्रवासात त्याला घडलेले मानवी वृत्ती-प्रवृत्ती आणि विकार-वासनांचे दर्शन वाचकालाही घडवतो. हे दर्शन घडवताना कवीला साधलेला परस्परविरोधी जाणिवांचा एकात्म आविष्कार या कवितेला आणि सोबतच नव्वदोत्तर मराठी कवितेलाही वेगळ्या वाटेने घेऊन जाणारा आहे.
– रमेश इंगळे उत्रादकर
लेखक | रवींद्र इंगळे चावरेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.