Additional information
लेखक | चिनुआ अचेबे |
---|---|
अनुवाद | सिद्राम पाटील |
पृष्ठसंख्या | 176 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
चिनुआ अचेबे (१९५०-२०१३) या इंग्रजीत लिहिणाऱ्या गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ नायजेरियन लेखकाची ‘थिंग्ज फॉल अपार्ट’ ही सर्वोत्तम कांदबरी असून आजतागायत तिच्या ५० भाषांत ८० लाखांपेक्षा जास्त प्रती छापल्या गेल्या आहेत.
‘स्वतःची’ गोष्ट स्वतः सांगण्याचा वसाहतिक समाजाचा अधिकार प्रस्थापित करण्याच्या संघर्षात चिनुआ अचेबे आघाडीवर होते. त्यांची ही पहिली कादंबरी, १८९०च्या दशकांत आफ्रिकेत वसाहत स्थापन करण्यासाठीच्या संघर्षात, युरोपियन ख्रिश्चन धर्माच्या इबो संस्कृतीवर झालेल्या विध्वंसकारी परिणामाची ‘आतून’ सांगितलेली गोष्ट आहे.
वसाहतवाद आणि ख्रिश्चन धर्माच्या चक्रावून टाकणाऱ्या राजकीय आणि आर्थिक शक्तीसमोर, असहाय संताप आणि शेवटी हिंसक कृतीने या कथेचा नायक ओकोन्कोने दिलेला प्रतिसाद वाचकांना हेलावून टाकतो. या माणसाची कथा मोजक्या शब्दांमध्ये आणि किंचित उपहासाच्या फिकट छटा वापरून चितारताना अचेबेंचे सर्वदेशी, सार्वकालिक मनुष्यत्त्वाचे भान सुटत नाही.
चिनुआ अचेबे यांच्या ‘थिंग्ज फॉल अपार्ट’ या कादंबरीचं ‘गोष्टी अशा विखरून पडतात’ हे मराठी भाषांतर प्रकाशित होत आहे, ही मराठी भाषेसाठी आणि वाचकांसाठी अनेक अर्थानं चांगली घटना आहे.
लेखक | चिनुआ अचेबे |
---|---|
अनुवाद | सिद्राम पाटील |
पृष्ठसंख्या | 176 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.