Additional information
लेखक | सुधीर पानसे |
---|---|
पृष्ठसंख्या | 84 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00.
गणित आणि कविता’ या कवितासंग्रहाचे वेगळेपण त्या संग्रहाच्या नावापासूनच सुरु होते. विज्ञानाच्या साऱ्या विद्या शाखांमध्ये गणित ही शाखा उच्च स्थानावर आहे. या शाखेला ‘क्वीन ऑफ सायन्सेस’ असे म्हटले जाते. तसेच कविता हा साहित्यातील भावनाविष्काराचा अत्यंत विशुद्ध भाग. हे दोन्ही जणू हातात हात गुंफून या संग्रहात वाचकांसमोर येत आहेत. काही अगदी थोडे अपवाद वगळता या संग्रहातील सर्व कविता या विज्ञानाच्या कोणत्या ना कोणत्या पैलूशी निगडित आहेत – मग ते वैज्ञानिकांचे जग असो, विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना असोत, विज्ञान-संशोधन आणि तंत्रज्ञान यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम असो, किंवा आपल्या समाजाचा अशा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन असो.
विज्ञान-कवितांना वाहिलेला असा हा निश्चितपणे मराठीतील पहिलाच ( आणि बहुदा भारतीय भाषांमध्येही पहिलाच ) कवितासंग्रह. विज्ञानकथा साहित्यप्रकार मराठी साहित्यात आता चांगला रुळाला आहे. ‘विज्ञानकविता’ हा साहित्यप्रकारही येथे असाच सफल होईल अशी आशा वाटते.
– डॉ. हेमचंद्र प्रधान
लेखक | सुधीर पानसे |
---|---|
पृष्ठसंख्या | 84 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.