लोकवाङमय गृह

Shop

क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर । भारत पाटणकर

Original price was: ₹300.00.Current price is: ₹255.00.

स्वातंत्र्य चळवळीतील प्रतिसरकारच्या चळवळीतील एक गोष्ट लिहिण्याची राहिली. प्रतिसरकार म्हणजे ब्रिटिश सरकारवर बहिष्कार आणि जनतेचं पर्यायी सरकार. हे प्रतिसरकार उभे राहिले नसते तर फार तर ते इंग्रजांना हाकलून लावण्याचा एक अतितीव्र लढा ठरला असता.
प्रतिसरकार होण्यासाठी प्रतिसरकारमधल्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या. त्या करीत असताना स्त्री कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. सावकार, जमीनदार, गुंड यांच्या अत्याचारविरुद्ध न्याय मिळत नव्हता. प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी गावोगावी न्यायदान मंडळं स्थापन करून जनताच स्वतः साठी न्याय मिळवून घेऊ लागली. हा न्याय जनतेच्या अधिकारात कसा मिळणार, याचे चित्र प्रत्यक्षात उभे राहिले.
चळवळीच्या स्त्री-पुरुषांनी जनतेला त्रास देणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. दारूबंदी अंमलात आणली. नवऱ्याने टाकलेल्या व सासूसासरे यांच्या जाचाला त्रासलेल्या स्त्रियांना या न्यायालयात न्याय मिळू लागला व मिळवून दिला जाऊ लागला. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवून त्यांना शासन दिले जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावर वचक बसला.
बिनहुंड्याची, बिनखर्चाची गांधी लग्ने होऊ लागली. ती पद्धत रूढ झाली. सहभोजने, मंदिरप्रवेश यासारखे कार्यक्रम घेऊन जातीभेदाविरुद्ध एक फळी उभी राहिली. हे सर्व केले म्हणून १९४२ साली झालेल्या सशस्त्र भूमिगत चळवळीचे, इंग्रजी सत्तेला पर्यायी सरकार, जनतेचे प्रतिसरकार उभे राहिले.

Category:

Additional information

लेखक

भारत पाटणकर

पाने

१७६

बांधणी

पेपरबॅक

आवृत्ती

दुसरी आवृत्ती- मार्च २०२५

ISBN

978-93-82906-53-7

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर । भारत पाटणकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com