Additional information
लेखक | ऋत्विज काळसेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
₹100.00
काळोखाच्या तळाशी असणारे दुःख आणि दुःखाच्या तळाशी असणारा काळोख यांच्या पिळातून लिहिली गेलेली ही कविता आहे.
चौकटीतील नियमबद्ध जगण्याशी जुळवून न घेता येणाऱ्याला करावा लागणारा हा पराभवाचा प्रवास आहे. इथे रोज ‘अपमानाच्या शॉवरखाली नाहत’ राहावं लागतं आणि ‘एक पानीकम चाय पिता पिताच / दुसरा दिवस सुरू होतो न् / पुन्हा तोच राडा / तोच दु:खाचा सडा / पडतोच जिनगानीच्या अंगणात’ असे दिवस. मग ‘जगण्याचं फक्त कलेवर’ उरतं. ‘ते पेरावं कुठं / तर वीतभर जागाही’ नसते. अशा ‘सटवीनं काहीच माथ्यावर न नोंदवलेल्या’ आयुष्याविषयीची तडफड, आपल्यासोबत इतरांची फरफट झाली त्याविषयी ‘तुला देऊ शकलो नाही काहीच / रितीच निघाली माझी पोतडी’ अशी तगमग, या साऱ्या कासाविशीतून आधार फक्त कवितेचाच आहे. तीसुद्धा अधेमधे सोडून जात असली तरी त्याला ‘धगधगत’ ठेवणारी तीच आहे, तीच त्याची ‘सगळ्या बऱ्यावाईटानंतरची आशा’ आहे.
– जयप्रकाश सावंत
लेखक | ऋत्विज काळसेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.