लोकवाङमय गृह

Shop

आठ फोडा आन बाहेर फेका । अमोल विनायकराव देशमुख

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

या कवितेतली कष्टणारी माणसं आपापल्या श्रद्धा जपणारी आहेत. कवी ज्याला ‘मिक्स एरिया’ म्हणतो त्या गाव- मोहल्ल्यात राहणारी आणि परस्परांना जीव लावणारी आहेत. जिथं वारीची परंपरा जपली जाते आणि उरुसही भरतो. संदल, मोहरमचे डोले निघतात आणि दिंडी- पालख्याही… हेव्यादाव्याचे दप्तर घेऊन न वावरणारी निरागस मुलं या कवितेत आहेत. दिवसभर राबून रात्री अंगणातल्या खाटेवर चांदण्याच्या सावलीत अंग टाकणारे अश्राप, रापलेले चेहरे आहेत. जिथे मस्जिदीच्या घुमटावरची महाकारूणिक पाखरं मंदिराच्या कळसावरही हजर होतात. ‘गंगा जमुनी तहजीब’चे हे रूप कवीच्या गावात दिसते. मात्र अलीकडे या संबंधांची घट्ट वीण उसवण्याचे प्रयत्न करणारे विद्वेषी राजकारण गावापर्यंत येऊन पोहोचले आहे. याकडे कवी लक्ष वेधतो.
ज्या माणसांची दुनिया या कवितेत आली आहे त्याच माणसांच्या ओबडधोबड पण काळजातल्या बोलीतून ती व्यक्त होते. या बोलीला दगड-धोंडयामधुन वाहणाऱ्या पाण्याचा नाद आणि तरतरीत रानाचा गंध आहे. मराठी कवितेत स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आश्वासन देणारी ही कविता आहे, तिला आणखी नवनवे धुमारे फुटोत !
– आसाराम लोमटे

Additional information

लेखक

अमोल विनायकराव देशमुख

पृष्ठसंख्या

116

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आठ फोडा आन बाहेर फेका । अमोल विनायकराव देशमुख”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us