लोकवाङमय गृह

Shop

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १०० वर्षं आणि जळगाव जिल्हा । डॉ. तेजोमयी भालेराव

Original price was: ₹100.00.Current price is: ₹80.00.

सन १९४६ च्या अमळनेर येथील गोळीबारापासून ते सन २००० पर्यंतच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या यशस्वी सांगतेपर्यंत जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षामार्फत अनेक लढे लढविले गेले. काही वेळेस विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाने प्रतिनिधीत्व केले. अनेक सामाजिक चळवळींमध्ये ठळक सहभाग नोंदविला. परंतु ९० च्या दशकात देशात जे काही बदल घडत गेले म्हणजेच खासगीकरण, उदारीकरण, सोव्हिएत रशियाचे पतन या अशा घटनांचे परिणाम पक्षाला सगळीकडेच जाणवायला लागले. तसेच जळगाव जिल्ह्यातही ते दिसायला लागले. दुसऱ्या फळीत नवीन सक्षम नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही. तरीही नमूद करावेसे वाटते की, पक्षाने जिल्ह्यात अनेक चळवळी चालवल्यात. बऱ्याच यशस्वी झाल्यात. आज प्रवाह क्षीण असला तरी कम्युनिस्ट पक्षाचे काम सुरूच आहे. या संबंध गत इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. तो पुरावेनिष्ठ आहे. वाचकांनी हा ऐवज गंभीरपणे वाचून त्यात मोलाची भर घालावी ही अपेक्षा.
– डॉ. तेजोमयी भालेराव

Additional information

लेखक

डॉ. तेजोमयी भालेराव

पृष्ठे

64

बांधणी

Paperback

ISBN

978-81-998771-7-7

मुखपृष्ठ

सरदार जाधव

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १०० वर्षं आणि जळगाव जिल्हा । डॉ. तेजोमयी भालेराव”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com