Additional information
लेखक | लक्ष्मीकांत देशमुख । उद्धव कांबळे । जयदेव डोळे |
---|---|
पाने | ६४ |
बांधणी | पेपरबॅक |
₹50.00
अलीकडे भारताला हिंदुराष्ट्र बनवावे असे म्हणणाऱ्या शक्तींचा जोर वाढू लागला आहे. या देशात राहणारे ८० टक्के लोक हिंदू धर्मात जन्मलेले असतात. मग याला ‘हिंदुराष्ट्र’ म्हणायला काय हरकत आहे? असे भाबडेपणाने अनेकांना वाटते. हा नुसता शब्दाचा प्रश्न नाही. हिंदू धर्माच्या नावाने तीन-चार हजार वर्षे मूठभर लोक सामान्यजनांना विषमतावादी रूढी व अंधश्रद्धा यात गुरफटून ठेवत आले. जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्रीला व पुरुषाला स्वतःच्या इच्छेनुसार सुखी, स्वाभिमानी व सर्जनशील जीवन जगण्याचा आणि सगळ्या व्यवहारात बरोबरीने वागण्याचा हक्क आहे. हे मूल्य इथे रुजवायला आणि त्याप्रमाणे समाजाचे व्यवहार बदलायला २०० वर्षे अनेक क्रांतिकारक विचारवंत व कार्यकर्त्यांनी चिकाटीने प्रयत्न केले आहेत. जुन्या व्यवस्थेत ज्यांना विशेष अधिकार वापरता येत होते, त्यांनी वेगवेगळ्या मागनि या परिवर्तनवाद्यांचा छळ केला, समाजातील महिला व त्यांनीच मागास ठरवलेल्या जातीतील लोकांना अनेक संधींपासून वंचित ठेवले, त्यांच्या विचारातला फोलपणा उघड करत स्वातंत्र्य व समतेवर आधारलेली नवी व्यवस्था उभी करण्यासाठी अविरत प्रयत्न करावे लागले. त्यामुळे भारतीय समाजात मोकळे वारे वाहू लागले असून, माणसे निर्भयपणे आपले माणूसपण जगू लागली आहेत. ज्यांच्या हितसंबंधांना झळ पोहोचली ते अलीकडे हिंदुराष्ट्राचा नारा बुलंद करत आहेत. त्यांच्या हिकमती कारवाया हिंसक मार्गाचाही अवलंब करू लागल्या आहेत. हिंसा वाढली की त्यात मोठ्या प्रमाणावर महिला, दलित व अन्य कष्टकरी लोकांचा बळी जातो. अनेकांची उपजीविकेची साधने नष्ट केली जातात. या धोक्यापासून भारत राष्ट्राला बाचवण्यासाठी स्वतः जागरूक राहणे, जास्तीत जास्त लोकांना तसे वागायला तयार करणे व संविधानाने उभारलेली व्यवस्था सुरक्षित राहावी यासाठी प्रयत्न करणे, हे प्रत्येक शिकलेल्या माणसाचे कर्तव्य आहे. ते बजावायला ही पुस्तिका भरपूर वैचारिक व मानसिक बळ देईल, असा विश्वास वाटतो.
– पन्नालाल सुराणा
लेखक | लक्ष्मीकांत देशमुख । उद्धव कांबळे । जयदेव डोळे |
---|---|
पाने | ६४ |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.