Additional information
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | 232 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
भारतीय समाजातील ज्या प्राचीन जाती जमातीनी या देशाला घडवून, भारतीय संस्कृतीचा अजरामर ठेवा निर्माण केला, त्यात ओड्ड, वड्ड, वडार जमातीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संपूर्ण भारतभर पसरलेल्या या जमातीची नोंद भारतीय इतिहासात एका शब्दांनेही घेतली गेली प्राचार्य शिवमूर्ती भांडेकर नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आदीवासी जमातीची म्हणून सांगितली जाणारी सगळी वैशिष्ट्ये या वडार जमातीत असतानाही तिला भटक्या-विमुक्त जमातीच्या यादीत समाविष्ट केले गेले आहे. हा या जमातीवर केला गेलेला अन्याय आहे. या जमातीचा आदिवासी म्हणून समावेश झाल्याशिवाय त्यांच्या प्रगतीचा मार्ग खूला होणार नाही, हे भांडेकर यांचे म्हणणे रास्त आहे.
अशा या आत्माभिमानी, कष्टाळू व संघर्षशील जीवन जगणाऱ्या वडार जमातीच्या प्राचीनत्वाची, वैचारिक / सामाजिक व सांस्कृतीक जीवनाची आणि संघटनात्मक चळवळीविषयीची माहिती या ग्रंथाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य लेखक प्राचार्य शिवमूर्ती भांडेकर यांनी केले आहे. यासाठी त्यांनी केलेल्या अभ्यासाचे व घेतलेल्या कष्टाचे कौतूक करावे तेवढे कमी आहे. एका दृष्टिने युगशिल्पी वडार जमातीचा हा दस्तावेज आहे. भावी पिढ्यांना अभ्यासासाठी तो मार्गदर्शक ठरणार आहे. या संशोधनपर ग्रंथाचे, या विषयाचे अभ्यासक, विद्यार्थी व जाणकार ग्रंथप्रेमी स्वागत करतील याची मला खात्री वाटते.
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | 232 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.