Additional information
लेखक | गौतम खुशालराव कांबळे |
---|---|
पृष्ठसंख्या | 340 |
बांधणी | हार्डकव्हर |
Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
भारतातील जमीन सुधाराची तत्त्वप्रणाली आंबेडकर, मार्क्स व गांधी या त्रिकोणामध्ये समाविष्ट असलेली दिसून येते….. भारतीय पार्श्वभूमीवर दलित-आदिवासींसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणाऱ्या आंबेडकरांच्या तत्त्वप्रणालीचा नव्या ग्रामीण बदलांचा वेध घेऊन नवा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न या ग्रंथात विशेषत्वाने करण्यात आला आहे. यासाठी देशातील कल्याणकारी अर्थशास्त्र अधिक सक्षम करण्याचा आग्रह या ग्रंथात झाला आहे.
– प्रा. डॉ. प्रो. सुखदेव थोरात
डॉ. गौतम कांबळे ह्यांचा आचार्य (पीएच.डी.) पदवीचा प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे, ह्याचा मला, त्यांचा मार्गदर्शक म्हणून आनंद होत आहे. ह्या घटनेचे खरे महत्त्व असे आहे की आता इतर वाचक- अभ्यासक विविधांगी मूल्यमापन होईल. हे शोध कार्य पूर्ण होताना डॉ. कांबळे ह्यांच्याकडून व मार्गदर्शक म्हणून माझ्याकडूनही ज्या त्रुटी राहून गेल्या असतील त्या कळण्याने आमच्या दोघांच्याही वैचारिक / सामाजिक प्रगतीला मदत होणार आहे.
एक मात्र खरे की, विदर्भातील नागपूर महसूल विभागातील (वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमधील) जमिनीबाबतचे व जमिनीच्या आधारे जगणाऱ्या दलित-आदिवासींच्या जगण्याच्या प्रश्नाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे डॉ. गौतम कांबळेंचा प्रबंध-ग्रंथ हा त्याबद्दलचा अंतिम अभ्यास न ठरता त्या प्रश्नाचा अधिक सखोल व विविध अंगांनी अभ्यास व्हावा, असे सुचविणारा ग्रंथ होईल असे वाटते.
– श्रीनिवास खांदेवाले
लेखक | गौतम खुशालराव कांबळे |
---|---|
पृष्ठसंख्या | 340 |
बांधणी | हार्डकव्हर |
Reviews
There are no reviews yet.