Additional information
लेखक | अरुण काळे |
---|---|
पृष्ठसंख्या | 104 |
₹100.00
तीव्र वैचारिक / सामाजिक भान जोपासणाऱ्या संवेदनाक्षम कार्यकर्त्याने समकालीन जगण्याला दिलेली कवितिक प्रतिक्रिया म्हणूनच कवी अरुण काळे यांच्या ‘रॉकगार्डन’ मधील कवितांकडे पाहावे लागते. सकल मानवमुक्तीसाठी आयुष्यभर झगडणाऱ्या जगभरातील थोर महापुरुषांच्या विचार- तत्त्वज्ञान- नैतिकमूल्ये तसेच राजकीय व वैचारिक / सामाजिक संस्कृतीची वर्तमान व्यवस्थेतील व्यक्तिगत स्वार्था- लोभा- कांक्षेपायी उत्तरोत्तर होत जाणारी पीछेहाट पाहताना, ऐंशी- नव्वदच्या दशकातील अस्वस्थ पिढीची होणारी घुसमट सामान्य कार्यकर्त्यांच्या परिप्रेक्ष्यातून शब्दबद्ध करणे, असेही या कवितांचे एक मध्यवर्ती सूत्र राहिले आहे. निम्नस्तरीय जनसामान्यांचे जगणे नियंत्रित करणाऱ्या बाजारू मूल्यव्यवस्थेतून फोफावलेल्या आत्मकेंद्री, स्वार्थपरायण, आपमतलबी वृत्तीला शरण जात व्यवस्थेशी जुळवून घ्यावे, शीतल हवेत बसून तिच्या विरोधात कविता लिहिताना क्रांतीचा झेंडा खांद्यावर घेणे मात्र व्यावहारिक चातुर्याने टाळावे, की अश्रूंची डागडुजी करून घेत ‘दिशादर्शी बोटाने दाखवलेली उजेडाची वाट’ जवळ करावी, असा एक . नैतिक पेच या कवितांना व्यापून राहिला आहे. स्वत:बरोबरच समकालीन समष्टीचे दुःख आणि यातना यांना सृजनाच्या पातळीवर नेण्याचा कवीचा हा प्रयत्न कवितेला अपेक्षित कलात्मक उंची गाठून देतो, या अर्थाने ‘रॉकगार्डन’ मधील कविता आधीच्या पिढीच्या पुढे जाताना पाहणे नुसतेच आशादायक नाही, तर आनंददायकही आहे.
– प्रवीण बांदेकर
Reviews
There are no reviews yet.